Join us  

अक्षय कुमारच नाही तर 'या' कलाकारांही साकारली आहे ट्रान्सजेंडरची भूमिका, कोण आहेत के कलाकार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 7:03 PM

1 / 9
सदाशिव अमरापूरकर यांनी संजय दत्त आणि पूजा भट्ट यांच्या 'सडक' या चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते.
2 / 9
परेश रावल यांनी 'तमन्ना' चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. त्यांच्याही भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.
3 / 9
बॉलिवूडचा प्रसिद्ध विनोदी अभिनेता जॉनी लीव्हरने बर्‍याच चित्रपटांमध्ये ट्रान्सजेंडरच्या भूमिका साकारल्या आहेत. जॉनी लीव्हरने 'जीत' आणि 'हाऊसफुल 4' सारख्या चित्रपटात ट्रान्सजेंडर भूमिका केल्या आहेत.
4 / 9
कंगना राणौतचा मुख्य भूमिका असलेल्या ‘रज्जो’ चित्रपटात महेश मांजरेकर यांनी ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. चित्रपटात त्याने बेगमची भूमिका साकारली होती, ज्याचे प्रेक्षक आणि समीक्षकांनीही कौतुक केले होते.
5 / 9
कंगना राणौतच्या ‘रज्जो’ चित्रपटात महेश मांजरेकर यांनी ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. चित्रपटात त्याने बेगमची भूमिका साकारली होती, ज्याचे प्रेक्षक आणि समीक्षकांनीही कौतुक केले होते.
6 / 9
या चित्रपटामध्ये प्रकाश राजने एक वेश्या व्यवसाय करणारी ट्रान्सजेंडर महाराणी नावाची भूमिका केली होती. तामिळ चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणारा प्रकाश राज पहिला अभिनेता होता.
7 / 9
इमरान हाशमी स्टारर फिल्म 'मर्डर 2' मध्ये प्रशांत नारायणन यांनी धडकी भरवणा-या ट्रान्सजेंडर सायकोची भूमिका साकारली होती.
8 / 9
9 / 9
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या ट्रेलरने प्रदर्शित होताच तुफान पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. ट्रेलर पाहिल्यामंतर अक्षयच्या चाहते सिनेमा प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या हॉरर-कॉमेडीमध्ये अक्षय कुमार ट्रान्सजेंडरची भूमिका साकारताना दिसणार आहे.
टॅग्स :लक्ष्मी बॉम्बअक्षय कुमार