कुशा कपिला पुन्हा प्रेमात? व्हायरल फोटोंमध्ये चेहरा लपवलेला 'तो' आहे तरी कोण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 15:45 IST
1 / 10लोकप्रिय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर व अभिनेत्री कुशा कपिला (Kusha Kapila) ही चर्चेत आली आहे. 2 / 10नुकतंच कुशा कपिलानं इन्स्टाग्रामवर 'मिस्ट्री मॅन'सोबतचे फोटो पोस्ट केलेत. 3 / 10यामध्ये कुशा कॉफी कलरच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय. तर तिच्यासोबतचा 'मिस्ट्री मॅन' हा व्हाईट शर्टमध्ये दिसतोय. 4 / 10कुशा कपिलानं या फोटोंमध्ये त्याचा चेहरा उघड केलेला नाही. त्यामुळे हे फोटो पाहून चाहते गोंधळात पडलेत. 5 / 10या फोटोंमध्ये कुशा 'मिस्ट्री मॅन'सोबत रोमँटिक पोझ देताना दिसतेय. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.6 / 10 हे फोटो पाहिल्यानंतर कुशा कपिला खरोखर या व्यक्तीला डेट करत आहे का? असे प्रश्न तिचे चाहते विचारत आहेत.7 / 10तर कुशा कपिलानं ज्या 'मिस्ट्री मॅन'सोबत फोटोशूट केलंय, तो तिचा बॉयफ्रेंड नाहीये. हे फोटोशूट तिच्या ब्रँडच्या जाहिरातीसाठी केलं गेलेलं आहे. हे कुशानं फोटोंना दिलेल्या कॅप्शनमधून सांगितलंय. 8 / 10कुशा कपिलाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, तिनं ५ वर्षांच्या डेटिंगनंतर २०१७ मध्ये जोरावर सिंगशी लग्न केलं होतं. परंतु २०२३ मध्ये त्यांचं नातं तुटलं आणि दोघांनी घटस्फोट घेतला.9 / 10यानंतर, तिचे नाव अभिनेता अर्जुन कपूर आणि नंतर स्टँड-अप कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी यांच्याशीही जोडलं गेलंय. पण कुशाने हे सर्व वृत्त फेटाळून लावलेत.10 / 10कुशा सध्या बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. तिनं भूमी पेडणेकर, शिल्पा शेट्टी यांच्यासोबत काम केलं आहे. तसंच अनेक कॉमेडी शोजमध्ये तिने परफॉर्म केलं आहे.