Kriti Sanon : "मी ढसाढसा रडले, पुन्हा कधीच..", कोरिओग्राफरने ५० लोकांसमोर केला कृती सॅननचा अपमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 18:12 IST
1 / 10कृती सॅननने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही कृतीला मिळाला आहे. 2 / 10२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मिमी' चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. या चित्रपटातील कृतीच्या कामाचं खूप कौतुक झालं आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली.3 / 10कृतीने तिच्या एका मुलाखतीत जुन्या दिवसांची आठवण सांगितली. तेव्हा तिला आलेला एक वाईट अनुभव सांगितला. एका कोरिओग्राफरने ५० लोकांसमोर तिचा कसा अपमान केला याबद्दल सांगितलं आहे. 4 / 10कृती म्हणाली, 'हिरोपंती थोडी उशिरा सुरू होणार होती आणि तेलुगू चित्रपटाचं दुसरं शेड्यूल २ महिन्यांनी सुरू होणार होतं. माझ्याकडे मध्ये २ महिने होते, तेव्हा मी GMAT परीक्षा दिली होती.'5 / 10अभिनेत्री म्हणाली की, ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे आणि फिल्मी बॅकग्राऊंड नसल्यामुळे, तिच्या पालकांना तिच्या करिअरची काळजी करावी लागू नये म्हणून तिने एक प्लॅन बी देखील तयार केला होता. 6 / 10जीमॅट परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही क्रितीला कधीही प्लॅन बी वापरावा लागला नाही. कृतीने सांगितलं की, चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ती मॉडेलिंग करायची. 7 / 10जेव्हा पहिला रॅम्प शो होता तेव्हा तिच्याकडून थोडी गडबड झाली. खरंतर, तिच्या हिल्स गवतामध्ये अडकल्या होत्या, ज्यामुळे कोरिओग्राफर तिच्यावर रागावला.8 / 10अभिनेत्री म्हणाली, “त्या दिवशी त्या कोरिओग्राफरने माझ्याशी असभ्य वर्तन केलं. ५० लोकांसमोर तो माझ्यावर खूप ओरडला. मी ढसाढसा रडले. त्यानंतर मी पुन्हा कधीच त्या कोरिओग्राफरसोबत काम केलं नाही.'9 / 10२०१४ मध्ये आलेल्या 'हिरोपंती' चित्रपटातून कृतीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ती 'दिलवाले', 'लुका छुपी', 'बरेली की बर्फी', 'हाऊसफुल ४' आणि 'भेडिया' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. 10 / 10