'वडिलांनीच केलं लैंगिक शोषण, आई अन् मला...', अभिनेत्री, राजकारणी खुशबू सुंदरचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 09:53 IST
1 / 8दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदर राजकारणातही सक्रिय आहे. कायम महिलांच्या अधिकारांवर भाष्य करणाऱ्या खुशबू सुंदर (Khushboo Sundar) त्यांच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांची राष्ट्रीय महिला आयोगा सदस्य म्हणून निवड करण्यात आली.2 / 8खुशबू सुंदर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या बालपणीच्या कटु आठवणी सांगितल्या आहेत आणि अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. वडिलांकडूनच कशाप्रकारे लैंगिक शोषण करण्यात आले याविषयी त्या मोकळेपणाने बोलल्या आहेत.3 / 8खुशबू सुंदर म्हणाल्या, मी ८ वर्षांची असतानाच माझं लैंगिक शोषण सुरु झालं. माझ्या वडिलांना वाटायचं की पत्नी आणि मुलांना मारहाण करणं हा त्यांचा अधिकार आहे. आपल्या एकुलत्या मुलीचं लैंगिक शोषणही करणं त्यांचा हक्क असल्याचं त्यांना वाटायचं.4 / 8मुलांसोबत जेव्हा गैरव्यवहार केला जातो तेव्हा कायम मुलाच्या मनात ते घर करुन राहतं. हे केवळ मुलगा किंवा मुलीसाठीच नाहीए. तर दोघांसाठी सारखंच आहे.5 / 8माझ्या आईचं वैवाहिक जीवन फार त्रासदायक होतं. मी १५ वर्षांची झाल्यानंतर वडिलांविरोधात आवाज उठवण्याचं धाडस माझ्यात आलं. मला वाटायचं आईने माझ्यावर विश्वासच नाही ठेवला तर ? कारण काहीही झालं तरी तिच्यासाठी पतीच परमेश्वर आहे.6 / 8मात्र मला जसंजसं कळायला लागलं मी याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. वडिलांनी आम्हाला सोडून दिलं. आता रोज जेवायचं तरी कुठून अशी बिकट परिस्थिती ओढवली होती. 7 / 8अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर यांनी २०२१ मध्ये रजनीकांत यांच्यासोबत 'अन्नात्थे' सिनेमात भूमिका केली होती. तर नुकतेच त्यांनी सुपरस्टार विजय च्या 'वारिसु' या सिनेमात कॅमिओ केला. 8 / 8खुशबू यांनी 'द बर्निंग ट्रेन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. तर २०१० मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला.