कतरिना कैफ-विकी कौशल हनीमूनसाठी जाणार या ठिकाणी, रिसेप्शननंतर होणार रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 14:43 IST
1 / 8कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलिवूडचे असे कपल आहे, ज्यांच्या लग्नाची वाट चाहते बऱ्याच मोठ्या कालावधीपासून पाहत होते.2 / 8अखेर कतरिना कैफ विकी कौशलसोबत उद्या म्हणजेच ९ डिसेंबरला लग्नबेडीत अडकणार आहे.3 / 8 कतरिना आणि विकीचा शाही विवाह सोहळा सवाई माधोपुरमधील सिक्स सेंस फोर्टमध्ये पार पडणार आहे.4 / 8 मागील काही दिवसांपूर्वी कतरिना आणि विकी लग्नानंतर हनीमूनला जाणार नाहीत, अशी चर्चा ऐकायला मिळत होती. मात्र आता त्यांच्या हनीमूनबाबत नवीन अपडेट समोर आली आहे.5 / 8 कतरिना आणि विकी सात फेरे घेतल्यानंतर हनीमूनसाठी रवाना होणार आहेत. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, रिसेप्शननंतर ते दोघे हनीमूनसाठी मालदीव्जला जाणार आहेत.6 / 8रिपोर्टनुसार, लग्नानंतर काही काळ कामातून ब्रेक घेत ते दोघे व्हॅकेशन एन्जॉय करणार आहेत. दोघांनी मिळून हनीमून डेस्टिनेशनची निवड केली आहे.7 / 8 हनीमूनला जाण्याआधी विकी कौशल आणि कतरिना कैफ मुंबईतील ताज लँड्स एंडमध्ये रिसेप्शन पार्टी देणार आहेत. मात्र अद्याप त्याची तारीख समोर आलेली नाही.8 / 8असे म्हटले जात आहे की, रिसेप्शनमध्ये इंडस्ट्रीतील ते सर्व लोक सहभागी होणार आहेत, ज्यांना विकी आणि कतरिना लग्नाला बोलवू शकले नाहीत. विकी आणि कतरिनाच्या लग्नात १२० लोक सहभागी होणार आहेत.