Join us  

विवाहित असूनही लग्न झालेल्या हीरोच्या पडली प्रेमात, सुपरस्टार वडिलांचा विरोध झुगारला, तर भावांनी दिली साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 9:18 AM

1 / 7
बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी त्यांच्या मर्जीने लग्नं केली आहेत. मात्र काही अभिनेत्यांनी त्यांच्या मुलांची लग्नं ही आपल्या आवडीनुसार करण्याचा प्रयत्न केला. काहींना त्यात यश मिळालं तर काही अपयशी ठरले. अशाच एका सुपरस्टारच्या कुटुंबात घडलेली घटना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 7
७० ते ९० च्या दशकांमध्ये चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या स्टारची मुलगी तिच्या इच्छेनुसार लग्न करू इच्छित होती. तेव्हा वडील तिच्या विरोधात गेले. आपल्या मुलीने कुठल्याही हीरोसोबत विवाह करू नये, असं त्यांना वाटायचं. मात्र तिच्या भावांनी तिला साथ दिली आणि वडिलांचा विरोध झुगारून तिचं लग्न लावून दिलं.
3 / 7
इथे ज्या सुपरस्टार अभिनेत्याचा आणि त्यांच्या मुलीला उल्लेख झाला आहे ते आहेत राज बब्बर आणि त्यांची कन्या. राज बब्बर यांना जुही बब्बर, प्रतीक बब्बर आणि आर्या बब्बर अशी तीन अपत्ये आहेत. यातील जुही बब्बर ही आधी लग्न झालेलं असूनही प्रसिद्ध टीव्ही होस्ट आणि अभिनेत्याच्या प्रेमात पडली.
4 / 7
या अभिनेत्याचं नाव आहे अनूप सोनी. अनूप सोनीचं घर जुही बब्बर हिच्या घरापासून ५ मिनिटांच्या अंतरावर होतं. इथेच त्यांची नजरानजर झाली आणि ते एकमेकांचा प्रेमात पडले. जुहीप्रमाणेच अनुप सोनी हा सुद्धा विवाहित होता. मात्र असं असूनही या दोघांचं प्रेमप्रकरण फुललं.
5 / 7
जुही बब्बर आणि अनूप सोनी यांच्या नात्याबाबत राज बब्बर हे खूश नव्हते. जुहीने अनूपशी विवाह करू नये असं त्यांना वाटत होते. त्यामुळे वडिलांची समजूत काढण्यासाठी जुहीने आधी तिचे दोन्ही भाऊ प्रतीक आणि आर्या यांची अनूपशी भेट घडवून आणली.
6 / 7
जुहीने कपिल शर्मा शोमध्ये या संपूर्ण घटनेचा उल्लेख केला होता. तिने सांगितले की, प्रतीक आणि आर्या यांनी वडिलांची समजून काढण्यासाठी खूप प्रयत्न केले होते.
7 / 7
अनूप सोनी आणि जुही बब्बर यांचं लग्न २०११ मध्ये झालं होतं. तत्पूर्वी अनूप सोनी याने पहिली पत्नी ऋतू सोनी हिला सन २०१० मध्ये घटस्फोट दिला. तर जुही लेखक बिजॉय नांबियार याच्याशी लग्न केल्यानंतर दोन वर्षांनी त्याच्यापासून वेगळी झाली होती.
टॅग्स :बॉलिवूडलग्नदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टअनुप सोनीराज बब्बर