Join us

"मी दोन मुलं दत्तक घेईन, मम्मीसोबत आरामात राहतील"; जिया शंकरने सांगितला लग्नाचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:13 IST

1 / 9
अभिनेत्री जिया शंकरने पिंकविलाला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये रिलेशनशिपबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने मोठा खुलासा केला आहे.
2 / 9
'मला नेहमीच फॅमिली हवी होती आणि मला जॉईंट फॅमिली जास्त आवडते' असं सांगितलं. तसेच लग्नाबद्दलही माहिती दिली.
3 / 9
'जास्तीत जास्त येत्या दोन वर्षांत लग्न करायचं आहे. जर कोणी भेटलं नाही तर मी मम्मीला सांगेन की, अरेंज मॅरेजची वेळ आता आली आहे.'
4 / 9
'मी अशी मुलगी आहे, जिला लग्न करायचं आहे. फॅमिली हवी आहे. मी दोन मुलं दत्तक घेईन. मी, माझी आई, दोन श्वान, एक मांजर आणि दोन मुलं अगदी आरामात राहू' असं म्हटलं.
5 / 9
जिया शंकरने आपलं अफेअर आणि ब्रेकअपबाबतही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की, तिला त्याचा अजिबात पश्चाताप होत नाही.
6 / 9
'मी एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये होती. ज्यामुळे मी खूप कोलमडून गेली होती. मी स्वत:ला हरवून बसले होते.'
7 / 9
जियाच्या अभिनयाने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. ती बिग ब़ॉस ओटीटी सीझन २ मध्ये देखील दिसली होती.
8 / 9
जिया सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत.
9 / 9
टॅग्स :बॉलिवूड