Jiya Shankar :"मी संपूर्ण आयुष्यभर सिंगल राहिन; लग्न करणार नाही, मुलांची झंझट नको"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 14:48 IST
1 / 11जिया शंकर अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. बिग बॉस ओटीटी २ मुळे ती प्रसिद्ध झाली. तिचे असंख्य चाहते आहेत. मात्र जियाचा आता लग्नाबद्दलचा विचार पुन्हा एकदा बदलला आहे. 2 / 11अभिनेत्रीने याआधी लवकरात लवकर लग्न करायचं असल्याचं म्हटलं होतं. पण आता एका मेकअप व्हिडीओमध्ये तिचा निर्णय बदलल्याचं पाहायला मिळत आहे. 3 / 11जियाने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, आता आयुष्यभर सिंगल राहायचं आहे. लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही आणि आईसोबत राहायचं आहे. 4 / 11'मला कोणासोबत राहायचं नाही. मी संपूर्ण आयुष्यभर सिंगल राहिन. लग्न करणार नाही. मला हे नको आहे. हे मी आता ठरवलं आहे.' 5 / 11'मला रिलेशनशिप नकोच आहे. मुलांची झंझटच नको. मी बालीमध्ये एक व्हिला बांधेन. माझी आई, दोन श्वान आणि एका मांजरीसोबत राहिन' असं म्हटलं.6 / 11काही महिन्यांपूर्वी जियाने 'मला नेहमीच फॅमिली हवी होती आणि मला जॉईंट फॅमिली जास्त आवडते' असं सांगितलं होतं. तसेच लग्नाबद्दलही माहिती दिली होती.7 / 11'जास्तीत जास्त येत्या दोन वर्षांत लग्न करायचं आहे. जर कोणी भेटलं नाही तर मी मम्मीला सांगेन की, अरेंज मॅरेजची वेळ आता आली आहे असं म्हटलं होतं.8 / 11जिया शंकरने आपलं अफेअर आणि ब्रेकअपबाबतही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की, तिला त्याचा अजिबात पश्चाताप होत नाही.9 / 11'मी एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये होती. ज्यामुळे मी खूप कोलमडून गेली होती. मी स्वत:ला हरवून बसले होते' असं म्हटलं होतं. 10 / 11जिया सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 11 / 11