कुटुंब एकत्र राहावं म्हणून जया बच्चन यांनी पाळलाय 'हा' महत्वाचा नियम, अभिषेक बच्चनचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 18:11 IST
1 / 7मनोरंजन विश्वात बच्चन कुटुंबाची चांगलीच चर्चा असते. अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या आणि जया बच्चन सोशल मीडियावर विविध कारणांनी चर्चेत असतात2 / 7जया बच्चन यांनी कुटुंबासाठी एक महत्वाचा नियम पाळलाय. याचा खुलासा अभिषेक बच्चन यांनी केलाय.जया बच्चन यांनी कुटुंबासाठी एक महत्वाचा नियम पाळलाय. याचा खुलासा अभिषेक बच्चन यांनी केलाय.3 / 7एका मुलाखतीत अभिषेक बच्चनला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, त्यांचं कुटुंब एकत्र बसून जेवतं का? की अभिषेक-ऐश्वर्या वेगळे आणि जया - अमिताभ वेगळे असे जेवतात का?4 / 7 त्यावेळी अभिषेकने उत्तर देताना सांगितलं होतं की, जर कुटुंबातले सर्व सदस्य एकाच दिवशी, एकाच शहरात असतील तर दिवसातून एकवेळा तरी सर्वांनी एकत्र बसून जेवावं, असा नियम जया बच्चन यांनी आखून दिलाय5 / 7जया बच्चन यांनी आखून दिलेल्या या नियमांमुळे कुटुंबातलं प्रेम टिकून राहतं. आणि सर्वांचं एकमेकांसोबत असलेलं नातं आणखी घट्ट होतं, असं अभिषेक म्हणाला6 / 7बच्चन कुटुंबाने नुकतीच एकत्र येऊन दिवाळी साजरी केली. बच्चन कुटुंब अनेक सण एकत्र साजरे करतात7 / 7सध्या अभिषेक बच्चन I want to talk सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर अमिताभ सध्या KBC 16 चं शूटिंग करत आहेत. ऐश्वर्या विविध फेस्टिव्हल आणि पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळते