अभिनेता विष्णू विशालवर भाळली ज्वाला गुट्टा, पाहा रोमॅन्टिक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 09:30 IST
1 / 9भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि अभिनेता विष्णू विशाल हे लव्हबर्ड्स लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. अभिनेता विष्णू विशालसोबत ज्चाला लग्नगाठ बांधणार आहे.2 / 9 अभिनेता होण्याआधी विष्णू तामिळनाडूकडून क्रिकेट खेळत होता. कदाचित खेळ हाच प्रेमातील दुवा ठरला आणि ज्वाला व विष्णु एकमेकांच्या जवळ आलेत.3 / 9खूप दिवसांपासून ज्वाला व विष्णू दोघे प्रेमात होते. गेल्यावर्षी म्हणजेच ज्वालाच्या 37 व्या वाढदिवशी या दोघांनी साखरपुडा केला होता. आता ते 22 एप्रिलला लग्न करणार असल्याची माहिती ज्वालाने स्वत: सोशल मीडियावरून दिली आहे. 4 / 9ज्वाला गुट्टा सध्या बॅडमिंटन अकॅडमी चालवते. तिने कॉमनवेल्थ खेळामध्ये, वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई चॅम्पियनशिप, तसेच दक्षिण आशियाई चॅम्पियनशिप यामध्ये पदकं मिळविली आहेत. 5 / 9विष्णू विशालला तर दक्षिण चित्रपटांतील सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. पण तो एक क्रिकेटपटू म्हणूनही ओळखला जातो.6 / 9विष्णुने आर, अश्विन आणि बद्रीनाथसोबत क्रिकेट खेळले आहे. त्याने तामिळनाडूसाठी अनेक स्पर्धा खेळल्या आहेत. त्यावेळी तो रमेश कुडावला नावाने ओळखला जात होता. पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याने क्रिकेटला रामराम केला.7 / 9क्रिकेट सोडल्यानंतर त्याने आपले नाव बदलून विष्णू असे नवे नामकरण केले. आता तो प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आहे. 8 / 9ज्वाला गुट्टाचे हे दुसरे लग्न आहे. याआधी तिने बॅडमिंटनपटू चेतन आनंदसोबत लग्न केले होते. मात्र 2011 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला आहे. 9 / 9 विष्णूचे सुद्धा हे दुसरे लग्न आहे. याआधी त्यानं रजनी नटराजन सोबत लग्न केले होते. मात्र नंतर ते विभक्त झाले.