Independence Day 2022: सलमान-शाहरूखपासून कंगना राणौतपर्यंत, या बॉलिवूडकरांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 17:22 IST
1 / 8देश आज ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे, या स्वातंत्र्याचा जल्लोष बॉलिवूडमध्येही पाहायला मिळत आहे. बॉलिवूड स्टार्स अक्षय कुमार, सलमान खान, कंगना रणौत, अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 8स्वातंत्र्य दिनानिमित्त सलमान खानने भारतीय नौदलाच्या जवानांसोबत तिरंगा फडकवतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 8बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने स्वातंत्र्य दिनानिमित्त पत्नी गौरी खान, मुले आर्यन आणि अबराम संग यांच्यासोबत घराच्या छतावर तिरंगा फडकवताना दिसला. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 8KGF अभिनेता यशने देखील स्वातंत्र्य दिनानिमित्त त्याच्या कुटुंबासह तिरंगा फडकवताना दिसला. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 8अनुष्का शर्माने तिचा नवरा विराट कोहलीसोबतचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही तिरंगा फडकवताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले, 'आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहोत. जगभरातील सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा! जय हिंद.' (फोटो: इंस्टाग्राम)6 / 8अक्षय कुमारने देखील सोशल मीडियावर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 8कंगना राणौतने तिच्या इन्स्टा स्टोरीवर तिरंगा फडकवतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)8 / 8 अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने तिरंगा फडकावतानाचा फोटो शेअर करत देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)