1 / 9'हेरा फेरी ३' मधून परेश रावल यांनी एक्झिट घेतल्यामुळे चाहते नाराज आहेत. 'हेरा फेरी'मध्ये त्यांनी साकारलेलं बाबूराव हे पात्र प्रचंड गाजलं. 2 / 9२००० साली प्रदर्शित झालेल्या 'हेरा फेरी'मधून अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. 3 / 9त्यानंतर 'फिर हेरा फेरी'मधून या तिघांनीही धमाल आणली. त्यामुळेच 'हेरा फेरी ३'साठीही चाहते उत्सुक होते. मात्र, यात आता परेश रावल दिसणार नाहीत. 4 / 9'हेरा फेरी'पासून एकत्र असलेलं हे त्रिकुट आता मात्र प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार नाही. पण, 'हेरा फेरी'साठी या त्रिकुटाने किती मानधन घेतलं होतं, हे तुम्हाला माहितीये का? 5 / 9'हेरा फेरी'मध्ये अक्षय कुमारने राजू ही भूमिका साकारली होती. याचे मीम्स अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होतात. 6 / 9'हेरा फेरी'मधील राजूसाठी खिलाडी कुमारने जवळपास २० लाख रुपये इतकं मानधन घेतलं होतं. 7 / 9तर सुनील शेट्टीने या चित्रपटात श्याम हे पात्र साकारलं होतं. यासाठी त्याला १९-२० लाख रुपये इतके पैसे मिळाले होते. 8 / 9'हेरा फेरी'मध्ये परेश रावल यांनी साकारलेल्या बाबूरावला तोड नाही. पण, यासाठी त्यांना अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीपेक्षा कमी मानधन मिळालं होतं.9 / 9७.५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'हेरा फेरी'मध्ये बाबूभैय्या साकारण्यासाठी परेश रावल यांना १६-१७ लाख रुपये इतकं मानधन मिळालं होतं.