1 / 7बोनी कपूर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते. बोनी यांनी निर्मिती केलेले अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या आवडीचे. ६९ व्या वर्षी बोनी यांनी त्यांचं वजन घटवून सर्वांना चकीत करुन सोडलं2 / 7बोनी कपूर यांचा नवीन लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या लूकमध्ये बोनी कपूर यांनी केलेलं जबरदस्त फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन बघून चाहते थक्क झालेत3 / 7बोनी कपूर यांनी तब्बल २६ किलो वजन कमी झालंय. कोणताही व्यायाम किंवा इतर शारीरिक श्रम न करता एका साध्या उपायाने बोनी यांनी वजन कमी केलंय. जाणून घ्या याचविषयी4 / 7वजन कमी करण्याचा बोनी कपूर यांनी चंगच बांधला होता. त्यांनी स्वतःसाठी अत्यंत कडक नियम लावले. ते नाश्त्याला फक्त फळांचा ज्यूस आणि ज्वारीची भाकरी खायचे.5 / 7याशिवाय रात्रीचं जेवण त्यांनी पूर्णपणे बंद केलं होतं. सकाळी ज्वारीची भाकरी खाऊन बोनी कपूर रात्री फक्त सूप प्यायचे.6 / 7बोनी कपूर यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने स्वतःचं वजन कमी केलं. बोनी कपूर यांनी कोणताही व्यायाम यासाठी केला नाही.7 / 7'माझी पत्नी श्रीदेवी अनेकदा सांगायची की, वजन कमी कर, केसांना नीट कर', असं बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. काही महिन्यांपूर्वी बोनी यांनी हेअर ट्रान्सप्लांटही केलं होतं.