Join us
Daily Top 2Weekly Top 5

Photos: श्रद्धा कपूरचा आलिशान सी फेसिंग फ्लॅट पाहिलात का? आईवडिलांसोबत याच घरात राहिली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 15:34 IST

1 / 8
बॉलिवूडची क्युट बबली गर्ल श्रद्धा कपूर (Shakti Kapoor) सध्या 'स्त्री 2' च्या यशाचा आनंद घेत आहे. या सिनेमाने ३०० कोटी पार कमाई केली आहे.
2 / 8
स्त्री 2 ला मिळत असलेल्या भरघोस यशानंतर आता श्रद्धा कपूर नवीन शिफ्ट झाली आहे. आतापर्यंत आईवडिलांसोबत राहत असलेली श्रद्धा आता हृतिक रोशनच्या फ्लॅटमध्ये राहायला गेली आहे. तसंच ती खिलाडी अक्षय कुमारची शेजारी झाली आहे.
3 / 8
श्रद्धा कपूर वडील शक्ती कपूर, आई शिवांगी कोल्हापुरे आणि भाऊ सिद्धांत कपूरसोबत जुहू येथील लक्झरियस फ्लॅटमध्ये राहायची. या ठिकाणाहून तिने सणासुदीला असो किंवा रविवारच्या दिवशी घरी आराम करतानाचे फोटो शेअर केले होते.
4 / 8
श्रद्धाचे हे आलिशान घर 3 बीएचके आहे. जन्मत:च ती कुटुंबासोबत याच घरात राहत आहे. घरातून अरबी समुद्राचं सुंदर दृश्य दिसतं. श्रद्धाने अनेकदा घरातून समुद्राचा व्ह्यू दिसणारा फोटो शेअर केला आहे.
5 / 8
घरातला लिव्हिंग एरियाही खूप कोझी आणि सुंदर आहे. हातात चहाचा कप घेऊन तिने अनेकदा या ठिकाणाहून मॉर्निंग फोटो शेअर केला आहे.
6 / 8
तसंच घरातलं फर्निचरही अगदी रॉयल आहे. भिंतीवर काही पेंटिंग्सही लावण्यात आले आहेत. तसंच आलिशान बाल्कनीही आहे. आपल्या पेटसोबत तिने फोटो पोस्ट केला आहे.
7 / 8
श्रद्धाने आईसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये बाल्कनीमध्ये त्यांनी रांगोळीसमोर हा फोटो काढला आहे. सणासुदीला श्रद्धाकडे कसं मराठमोळं वातावरण असतं याची झलक तिने अनेकदा दाखवली आहे.
8 / 8
कपूर कुटुंबाच्या या लक्झरीयस फ्लॅटची किंमत तब्बल ६० कोटी आहे. जुहूमधील अत्यंत मध्यवर्ती भागात त्यांचा हा फ्लॅट आहे.
टॅग्स :श्रद्धा कपूरबॉलिवूडसुंदर गृहनियोजनशक्ती कपूरमुंबई