Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रीची घटस्फोटानंतर नवी सुरुवात; खास व्यक्तींसोबत पोहोचली जपानमध्ये, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 19:01 IST

1 / 10
लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
2 / 10
हंसिका सध्या तिच्या आयुष्यातील एका अत्यंत कठीण पण महत्त्वाच्या टप्प्यातून जात आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा घटस्फोट झाला.
3 / 10
आता हंसिकाने कामातून ब्रेक घेत थेट जपान गाठले आहे. तिचे या ट्रीपचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
4 / 10
हंसिकाने जपानमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट दिली आहे. तिथे आपली आई आणि भावासोबत हंसिकानं सुंदर वेळ घालवला.
5 / 10
तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत असून, तिची ही नवी सुरुवात पाहून चाहतेही आनंद व्यक्त करत आहे
6 / 10
हंसिका आणि सोहेल कथुरिया यांचा विवाह डिसेंबर २०२२ मध्ये अत्यंत थाटामाटात पार पडला होता. मात्र, हे नाते फार काळ टिकू शकले नाही.
7 / 10
जुलै २०२४ पासूनच हे जोडपे वेगळे राहत होते. अखेर मार्च २०२६ मध्ये मुंबईतील वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने परस्पर संमतीने त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले.
8 / 10
या घटस्फोटातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हंसिका मोटवानीने सोहेल खातुरियाकडून कोणतीही पोटगी किंवा आर्थिक मदत घेण्यास नकार दिला आहे. तिला हे नातं सन्मानाने आणि शांततेने संपवायचं होतं, असं तिच्या वकिलांनी स्पष्ट केलं होतं.
9 / 10
हंसिका सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसते.
10 / 10
'कोई मिल गया' या चित्रपटात हंसिका मोटवानी बालकलाकार म्हणून दिसली होती. त्याआधी २००३ मध्ये 'शाका लाका बूम बूम' या टीव्ही सीरिअलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हंसिकाने आपला अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता.
टॅग्स :हंसिका मोटवानीबॉलिवूडसेलिब्रिटी