By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:02 IST
1 / 7जान्हवी कपूरची लाल पैठणी साडी खूपच आकर्षक आहे. मॉडर्न ब्लाऊज आणि सॉफ्ट मेकअपमुळे जान्हवीचा लुक खास ठरतो. जान्हवी मॉडर्न आणि ट्रेडिशनल आउटफिटमध्ये किती सुंदर दिसते, हेच यातून पाहायला मिळतं.2 / 7भरजरी दागिने, मोत्यांची नथ आणि साजश्रृंगार करुन जिनिलीया देशमुख गुढीपाडव्यासाठी सज्ज आहे. तिचा हा लूक तरुणींसह महिलावर्ग नक्कीच फॉलो करु शकतात यात शंका नाही.3 / 7विद्या बालनने हिरव्या पैठणीसह भगव्या रंगाचा पदर असलेली सुंदर साडी नेसली आहे. साडीमधील नक्षीकाम आणि पारंपरिक दागिन्यांसह विद्याचा खूप देखणा आणि पारंपरित वाटतोय.4 / 7आलिया भटने पीच आणि पिंक शेड्समध्ये पैठणी साडीला एक नवीन आणि आकर्षक लुक दिला आहे. मिनिमल स्टाइलिंगमुळे आलियाची की खास स्टाइल खूपच फ्रेश वाटतेय.5 / 7श्रद्धा कपूरने जांभळ्या पैठणी साडीत साधा पण रॉयल लुक साकारला आहे. हलक्या दागिन्यांसह श्रद्धाचा लूक जरी साधासुधा असली तरीही या लूकमध्ये ती खूप आकर्षक दिसतेय.6 / 7हिरवी साडी, लाल रंगाचा पदर आणि त्यावर मोराची नक्षी असलेली साडी मृणाल ठाकूरवर खूप खुलुन दिसतेय. मृणाल ठाकूरने परिधान केलेली नथ तिच्या लूकवर खुलून दिसतेय.7 / 7माधुरी दीक्षितची पिवळी पैठणी गुढीपाडव्याच्या उत्सवी वातावरणाला साजेशी आहे. नथ, गजरा आणि सोन्याचे दागिने माधुरीच्या लुकला एकदम महाराष्ट्रीयन टच देतात.