Join us

'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात आकंड बुडाला होता गोविंदा! रागाच्या भरात सुनीतासोबत साखरपुडा मोडला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 12:51 IST

1 / 8
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यात सध्या ऑल इज नॉट वेल असल्याची चिन्हे आहेत. सध्या सगळीकडे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत.
2 / 8
जवळपास ३८ वर्ष संसार केल्यानंतर गोविंदा आणि सुनीता यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या बातम्या सातत्याने कानावर येत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने वांद्रे कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
3 / 8
या सगळ्या प्रकरणामुळे अभिनेत्याची लव्हलाईफ शिवाय अनेक गोष्टी समोर येत आहेत.
4 / 8
5 / 8
'हिरो नंबर १','कुली नंबर १','बड़े मियां-छोटे मियां','जोड़ी नंबर वन', अशा एकापेक्षा एक सिनेमातून गोविंदान लोकांचं भरभरून मनोरंजन केलं.
6 / 8
चित्रपटांव्यतिरिक्त गोविंदाचे अफेअर्सही अनेकदा चर्चेचा विषय ठरले होते. बॉलिवूडमध्ये गोविंदाची जोडी सर्वातआधी नीलमसोबत बनली होती. खुदगर्ज, लव ८६, दो कैदी, इल्जाम, हत्या आणि सिंदूरसहीत साधारण १० सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं.
7 / 8
याचदरम्यान, त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या होत्या. गोविंदा नीलमच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. नीताशी लग्न ठरले असतानाहीपुढे तो तिच्यात गुंतत गेला. रागाच्या भरात त्याने सुनीतासोबत साखरपुडा देखील मोडला होता. एका मुलाखतीत गोविंदाने याबद्दल सांगितलं होतं.
8 / 8
एका मुलाखतीत गोविंदा म्हणाला होता की, 'मी घरीही नीलमबाबत बोलत राहत होतो. सुनीतासोबत नातं जोडल्या गेल्यावर तर मी तिलाही नीलमसारखं होण्याबाबत सांगत होतो. मी सुनीताला सांगत होतो की, तू नीलमकडून काही शिकली पाहिजे. यामुळे सुनीता चिंतेत राहत होती. एक दिवस सुनीता नीलमबाबत काहीतरी बोलली तेव्हा मी फारच अग्रेसिव्ह झालो आणि सुनीतासोबतचा साखरपुडाही मोडला होता.'
टॅग्स :गोविंदाबॉलिवूडसेलिब्रिटी