Join us
Daily Top 2Weekly Top 5

'वेड'नंतर देशमुखांच्या सूनबाईंना करायच्यात अशा भूमिका, जिनिलिया म्हणाली - 'आता वयाची ३५ ओलांडताना...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 08:00 IST

1 / 10
बॉलिवूडचं लाडकं कपल रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा वेड चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. वेड चित्रपटाने नुकतेच ५० कोटींचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. हा प्रतिसाद पाहून रितेशने सोशल मीडियावरून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
2 / 10
जिनिलियाचा हा अभिनित केलेला पहिलाच मराठी चित्रपट आहे. रितेश सोबत लग्न झाल्यानंतर जिनिलिया अभिनय क्षेत्रापासून दुरावली होती.
3 / 10
लग्नानंतर जिनिलियाने घर संसार, मुलांची जबाबदारी नेटाने सांभाळली. मात्र आता तिने चित्रपटातून पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवावी अशी विचारणा तिला केली जात आहे.
4 / 10
चित्रपटात काम करण्याबाबत जिनिलियाचे मत आहे. आता वयाची ३५ ओलांडताना तशा धाटणीच्या भूमिका याव्यात याचा ती विचार करते. वयाचा एक टप्पा मी ओलांडला आहे.
5 / 10
ज्या काळात लव्हस्टोरी दाखवणारे चित्रपट करायचे होते ते तिने केले. मात्र आता आपण वेगळ्या वयोगटात मोडतो हे ती आवर्जून सांगते.
6 / 10
खरेतर पन्नाशी ओलांडली तरीही अभिनेत्रींना नायिकेच्या भूमिका मिळाव्यात अशी अपेक्षा केली जाते. मात्र जिनिलियाचे याबाबतचे मत मात्र वेगळे आहे. वेळ ओळखून आपण त्याच पठडीतील भूमिका साकारल्या तर ते प्रेक्षकांना सुद्धा आवडणार नाही.
7 / 10
जिनिलिया सांगते की, आज मी दुसर्‍या वयोगटात आहे आणि मला त्या वयोगटातील भूमिका करायच्या आहेत. मला वाटते की आजच्या काळात अधिक चांगल्या भूमिका लिहिल्या जातात.
8 / 10
तू एकटी आई असू शकतेस, विवाहित आई असू शकतेस, तुझी प्रेमकथा असू शकते, हा वयोगट खूप सुंदर आहे. मला आशा आहे की माझ्यासाठी त्या झोनमध्ये भूमिका लिहिल्या जातील, असे जिनिलियाला वाटते.
9 / 10
जिनिलिया बराच मोठा काळ सिनेइंडस्ट्रीपासून लांब होती. त्यावेळी तिच्याकडे चांगल्या डायरेक्टरच्या उत्तम भूमिका देखील आल्या होत्या पण त्यावेळी त्या भूमिका तिने करायच्या टाळल्या होत्या.
10 / 10
मात्र आता वेडमधून तिने इंडस्ट्रीत कमबॅक केला आहे. त्यामुळे वेडनंतर ती आणखी कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसेल, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
टॅग्स :जेनेलिया डिसूजारितेश देशमुखवेड चित्रपट