Join us  

सनी देओलच्या ५६ कोटींच्या बंगल्यावर होती जप्तीची टांगती तलवार पण 'गदर २'ने सगळंच बदललं, आता आहे सगळ्यात महागडा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 9:08 AM

1 / 8
गदर २ सिनेमाने सनी देओलच्या करिअरला पुन्हा एकदा नव्याने उभारी दिली असचं म्हणावं लागेल. तब्बल २२ वर्षानंतर रिलीज झालेल्या या सिनेमाने सनीचं करिअर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.
2 / 8
गदर २ रिलीज झाला तेव्हा मुंबईतल्या 'सनी व्हिला' या त्याच्या बंगल्याचा लिलाव होणार होता. व्हिलावर असलेले ५६ कोटींचे कर्ज न फेडल्याप्रकरणी त्याच्या बंगल्याचा लिलाव होणार होता.
3 / 8
पण यानंतर बँकेने यू-टर्न घेत लिलाव रद्द केला. बँकेने सनी देओलला २०१६ मध्ये चित्रपट निर्मितीसाठी हे कर्ज दिले होते. मात्र गदर २ च्या यशानंतर सनी देओलच्या आयुष्यातील सगळं बदललं.
4 / 8
आता प्रेक्षक आपल्या आवडत्या स्टारला अधिकाधिक पाहण्यासाठी आसुसले आहेत. त्यामुळे 'गदर २'नंतर आता सनी देओल बॉर्डर 2मध्ये झळकणार आहे. बॉर्डर 2 चित्रपटाची शूटिंग 2024 मध्ये सुरु केले जाणार आहे.
5 / 8
मीडिया रिपोर्टनुसार, सनी देओलने बॉर्डर २ सिनेमासाठी ५० कोटी रुपये फी चार्ज केली आहे. केवळ फी नाही, तर अभिनेता सिनेमाला झालेला नफादेखील शेअर करणार आहे.
6 / 8
सनी देओलने गदर २ सिनेमासाठी २० कोटी रुपये मानधन घेतलं होतं. गदर २ हिट झाला आणि सनीचा भाव चांगलाच वधारला. निर्माते जेपी दत्ता आणि भूषण कुमार यांच्याशी सनी देओल यांच्यातील डीलदेखील फायनल झाल्याचं बोललं जातं.
7 / 8
१९९७ च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या ब्लॉकबस्टर चित्रपटात सनी देओल व्यतिरिक्त सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, पुनीत इस्सार, सुदेश बेरी आणि इतरांसोबत भूमिका केल्या होत्या.
8 / 8
आता 'बॉर्डर २' सिनेमाचं शूटिंग २०२४ च्या मध्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती आहे.
टॅग्स :सनी देओल