Join us  

सनी देओलनं सांगितलं पत्नी पूजाचं लाईमलाईटपासून दूर राहण्यामागचं कारण, म्हणाला, "ती जाणूनबूजून...."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 2:37 PM

1 / 8
Sunny Deol: बॉलिवूडचा दमदार अभिनेता म्हणून ओळखला जाणारा सनी देओलच्या 'गदर 2'ने ५०० कोटींहून अधिकची कमाई केली.तारा सिंगचा हा सिनेमा 2023 सालचा तिसरा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला.
2 / 8
'गदर 2'च्या यशानंतर अभिनेता आता त्याच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करत आहे. दरम्यान, सनीने त्याची पत्नी पूजा देओलबद्दल पहिल्यांदाच खुलासा केला. पूजा कायम लाइमलाइटपासून दूर राहते. या मागचं कारण सनीने पहिल्यांदाच सांगितलं आहे.
3 / 8
सनी देओल अनेकदा आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. पण पत्नी पूजा देओल हिचा फोटो मात्र चुकूनही त्याच्या सोशल अकाऊंटवर दिसत नाही.
4 / 8
सनी देओलची पत्नी आणि धर्मेन्द्र यांची मोठी सून पूजा देओल मीडियापासून दूर राहते. सौंदर्याच्या बाबतीत पूजा देओल बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते.
5 / 8
करण जोहरच्या लोकप्रिय शो 'कॉफी विथ करण 8' च्या दुसऱ्या सीझनमध्ये सनी देओल आणि बॉबी देओल आले होते. या सीझनमध्ये दरम्यान, सनीने त्याची पत्नी पूजा देओल लाइमलाइटपासून का दूर राहते याचा खुलासा केला आहे.
6 / 8
अभिनेता म्हणाला, पूजा जाणीवपूर्वक लाइमलाइटपासून दूर राहते. कोणीतरी सतत त्याच्यामागे कॅमेरा घेऊन फिरणार हे तिला आवडत नाही. सनीने सांगितले की, पूजा आणि तो दोघेही असेच आहेत. सनी पुढे म्हणाला की, म्हणूनच जेव्हा जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी परदेशात जातो कारण तिथे तुम्हाला कोणी त्रास देत नाही.
7 / 8
सनी देओलचा थोरला लेक करण देओलचं लग्नात पूजा पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाल्या.सनी देओलची पत्नी पूजा देओल चित्रपट जगतापासून दूर आहे आणि तिने लंडनमध्ये शिक्षण घेतले आहे आणि तिथेच वाढली आहे. इतकंच नाही तर ती तिच्या घराची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडते.
8 / 8
पूजा देओल आणि सनी देओलचं लग्न हे अरेंज्ड मॅरेज होते बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याआधीच सनी यांनी पूजासोबत लग्न केले होते.
टॅग्स :सनी देओल