Join us

शॅम्पेन, बोटिंग आणि बरंच काही! प्रसिद्ध गायिकेचा साखरपुडा, बॉयफ्रेंडने खास अंदाजात प्रपोज करताच झाली भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 15:49 IST

1 / 7
प्रसिद्ध गायिका प्रकृती कक्करने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
2 / 7
बॉयफ्रेंडने खास अंदाजात प्रपोज केल्याने प्रकृती भावुक झालेली दिसली. या दोघांचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले आहेत.
3 / 7
१ मे २०२५ रोजी प्रकृतीने तिचा बॉयफ्रेंड विनय आनंदसोबत साखरपुडा केला आहे. प्रकृतीच्या बॉयफ्रेंडने तिला ड्रीमी अंदाजात प्रपोज केलं.
4 / 7
शँपेन उडवत प्रकृती आणि तिचा बॉयफ्रेंड विनयने जल्लोष साजरा केला. विनय आनंद हे व्यवसायाने उद्योजक असून Aer Media आणि Unbox Social चे सह-संस्थापक आहेत
5 / 7
प्रकृती आणि विनयचे जोडी चाहत्यांना खूप आवडली आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
6 / 7
प्रकृती कक्कर ही एक प्रसिद्ध गायिका आहे. तिने 'भीग लूं', 'कतरा कतरा', 'माफियां', 'हम तुम' यांसारख्या हिट गाण्यांना आपला आवाज दिला आहे
7 / 7
प्रकृती आणि विनयने अद्याप त्यांच्या लग्नाच्या तारखेची घोषणा केलेली नाही.​ दोघांच्या खास जोडीची आणि रोमँटिक फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे.
टॅग्स :बॉलिवूडलग्न