हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:28 IST
1 / 5बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेते धर्मेंद्र हे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच लव्हलाईफमुळेही एकेकाळी खूप चर्चेत असायचे. धर्मेंद्र यांनी विवाहित असूनही हेमा मालिनी यांच्याशी केलेला दुसरा विवाह त्या काळी खूप गाजला होता. मात्र हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरा संसार थाटल्यानंतरही धर्मेंद्र आणखी एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते, ही बाब फारच थोड्या लोकांना माहिती आहे. 2 / 5ही अभिनेत्री धर्मेंद्र यांच्यापेक्षा वयाने तब्बल २७ वर्षांनी लहान होती. तिचं नाव होतं अनीता राज. अनिता हिने धर्मेंद्र यांच्यासोबत ‘नौकर बिवी’ या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटामधील दोघांचीही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. याचदरम्यान, दोघांचीही जवळीक वाढली होती. एवढंच नाही तर धर्मेंद्र आणि अनित यांच्यातील अफेअरच्या खमंग चर्चाही रंगल्या होत्या. 3 / 5 त्यानंतरच्या काळात धर्मेंद्र आणि अनिता यांनी मिळून अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच त्यांच्यातील प्रेम प्रकरणाचीही सगळीकडे चर्चा होऊ लागली होती. दरम्यान, ही बाब हेमा मालिनी यांना समजली तेव्हा त्या नाराज झाल्या. त्यानंतर धर्मेंद्र यांनी अनिता राज यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम करणं थांबवलं. 4 / 5 अनिता राज हिच्यासोबतचं अफेअर संपुष्टात आल्यानंतर धर्मेंद्र यांनी पुढे कुठल्याही अभिनेत्रीसोबत मैत्री केली नाही. 5 / 5धर्मेंद्र आणि अनिता राज यांच्या जोडीने सुमारे दशकभर बॉलिवूडमधील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होतं. त्यांनी गुलामी, जिने नही दुंगा, हम से न टकरानासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.