Join us
Daily Top 2Weekly Top 5

बादशहा शाहरुख खानच्या बॉडीगार्डचा पगार माहित्येय का? व्हॉल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 17:17 IST

1 / 8
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अभिनयाने हजारो प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. रुपेरी पडद्यासह अमिताभ बच्चन यांनी छोट्या पडद्यावरही आपला ठसा उमठवला आहे.
2 / 8
अमिताभ बच्चन यांचे चाहते फक्त भारतातच नाही, तर जगभरात आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी अंगरक्षक (बॉडीगार्ड) म्हणून मुंबई पोलीस विभागाशी संबंधीत कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे दिसून येत होते.
3 / 8
जितेंद्र शिंदे यांना मिळणाऱ्या पगाराचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली असून मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. बिग बी अमिताभ यांच्यानंतर आता बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या सुरक्षारक्षकांवर किती खर्च होतो, याची चर्चा रंगली आहे.
4 / 8
शाहरुख खान लक्झरी लाईफस्टाईल जगतात, त्यामुळेच ब्रँडनेम असलेल्या शाहरुख खान यांच्याकडील कारची, बंगल्याची आणि संपत्तीची नेहमीच चर्चा होते. आता, शाहरुख खान यांच्या बॉडिगार्डच्या पगाराची चर्चा होत आहे.
5 / 8
शाहरुख खान जेथे पोहोचतात तेथे गर्दी तर होणारच. त्यामुळेच, एसआरकेने आपल्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड ठेवला असून त्यांवरच सुरक्षेची जबाबदारी आहे. शाहरुखलाही बॉडीगार्ड रवि सिंहवर मोठा विश्वास आहे.
6 / 8
रवि सिंहच्या सुरक्षेत बादशहा शाहरुख सुरक्षीत असतात, पल्बीक लाईफमध्ये, गर्दीच्याठिकाणी किंवा सार्वजनिक कार्यक्रमात शाहरुखच्या सुरक्षेची जबाबदारी रवि यांच्याकडेच असते.
7 / 8
सिने जगतात सर्वाधिक पगार घेणाऱ्या बॉडिगार्डमध्ये रवि सिंह यांचं नाव येतं. रवि हे गेल्या दशकभरापासून शाहरुख यांची सुरक्षा करत आहे. त्यासाठी, त्यांना वर्षाला 2.7 कोटी रुपये पगार मिळतो. बॉलिवूडमधला हा सर्वाधिक पगार आहे.
8 / 8
एखाद्या सेलिब्रिटीच्या सुरक्षेची जबाबदारी घेणं मोठं जोखीमेचं काम आहे. कारण, या कामात वेळेचं कुठलंही बंधन नसून सातत्याने सेलिब्रिटींसोबत राहवं लागतं. कधी-कधी या नोकरीत जीव गमावण्याचाही धोका असतो.
टॅग्स :शाहरुख खानअमिताभ बच्चनबॉलिवूडसिनेमा