Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्या बात! 'बॉर्डर' पाहण्यासाठी पैसे नव्हते, आज 'बॉर्डर २' मध्ये अभिनय करुन 'हा' अभिनेता जिंकतोय मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 13:48 IST

1 / 7
सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या 'बॉर्डर २' चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटातील एक अभिनेता असा आहे ज्याच्याकडे १९९७ साली जेव्हा मूळ 'बॉर्डर' सिनेमा आला होता. ते पाहण्यासाठी पैसे नव्हते.
2 / 7
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे दिलजीत दोसांझ. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिलजीतने आपल्या संघर्षाच्या काळातील एक हृदयस्पर्शी आठवण शेअर केली आहे.
3 / 7
'जेव्हा 'बॉर्डर' रिलीज झाला, तेव्हा मी खूप लहान होतो. माझ्या गावात आणि परिसरात या चित्रपटाची प्रचंड क्रेझ होती. माझ्या आसपास अनेक लोकांनी हा सिनेमा पाहिला होता'', असं दिलजीत म्हणाला.
4 / 7
''परंतु मी हा सिनेमा इच्छा असूनही पाहू शकलो नाही. माझ्याकडे तेव्हा पैसे नव्हते. माझ्या कुटुंबानेही मला पैसे दिले नाहीत. ते तरी मला पैसे कसे देतील. कारण तेव्हा कुटुंबात पैशांची अडचण असायची''; असा भावुक खुलासा दिलजीतने केला.
5 / 7
''तेव्हा मी बॉर्डर पाहू शकलो नाही. पण भविष्यात याच सिनेमाच्या पुढच्या भागात मी काम करेन, हा विचार मी तेव्हा केला नव्हता'', अशा भावना दिलजीतने व्यक्त केल्या.
6 / 7
'बॉर्डर २' सिनेमात दिलजीतने निर्मल जित सिंग सिखों यांची भूमिका साकारली आहे. ही भूमिका खऱ्या आयुष्यातील व्यक्तिरेखेवर आधारीत असल्याची चर्चा आहे.
7 / 7
'बॉर्डर २' सिनेमाविषयी सांगायचं तर, अनुराग सिंगने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सनी देओल, दिलजीत, वरुण धवन, अहान शेट्टी या कलाकारांची सिनेमात प्रमुख भूमिका आहे.
टॅग्स :दिलजीत दोसांझसीमारेषासनी देओलवरूण धवनअहान शेट्टी