Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर' मधील रेहमान डकैतची ऑनस्क्रिन पत्नी! खऱ्या आयुष्यात दिसते भलतीच ग्लॅमरस, गाजवलाय छोटा पडदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 17:13 IST

1 / 7
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून तो सर्वत्र चर्चेत आहे.
2 / 7
'धुरंधर'मध्ये रणवीर सिंगसोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन आणि राकेश बेदी हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.
3 / 7
मात्र, चित्रपटात अक्षय खन्नाने साकारलेला रेहमान डकैत भाव खाऊन गेला आहे. त्याच्या कामाचं समीक्षकांसह प्रेक्षक देखील भरभरून कौतुक करत आहेत.
4 / 7
परंतु, तुम्हाला माहितीये का? धुरंधरमध्ये रेहमान डकैत अर्थात अक्षय खन्नाच्या ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका अभिनेत्री सौम्या टंडनने साकारली आहे.
5 / 7
सौम्या टंडनला लोक 'भाभीजी घर पर हैं' मधील 'गोरी मेम'च्या भूमिकेमुळे ओळखतात. आता 'गोरी मॅम' नंतर सौम्याला या चित्रपटात एका वेगळ्या अवतारात पाहिले गेले
6 / 7
'भाभीजी घर पर हैं' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस दिसते. धुरंधरमध्ये तिची छोटेखानी भूमिका असली तरी त्यामुळे ती चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चेत आली आहे.
7 / 7
अभिनेत्री सौम्या टंडन टीव्ही शो 'भाबीजी घर पर है' मधील तिच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. सौम्याने बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानबरोबर रिअॅलिटी शो 'जोर का झटका: टोटल वाइपआउट' होस्ट केला होता.
टॅग्स :अक्षय खन्नाबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी