1 / 7बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची सनी, बॉबी ही दोन्ही मुलं तर सर्वांनाच ठाऊक आहेत. पण धर्मेंद्र यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुलीही आहेत. विजेता आणि अजिता अशी त्यांची नावं आहेत. या दोघींनी नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहणंच पसंत केलं.2 / 7धर्मेंद्र यांची पहिली मुलगी विजेता देओल (Vijeta Deol) आता ६१ वर्षांची आहे. तिने व्यावसायिक विवेक गिल सोबत 1988 मध्ये लग्न केले. विजेता 'राजकमल होल्डिंग्स अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड'च्या संचालकही आहेत. दोघांना प्रेरणा गिल (Prerna Gill) ही मुलगी आहे.3 / 7धर्मेंद्र यांची नात प्रेरणा गिल दिसायला बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. मात्र तिने अभिनय क्षेत्र न निवडता वेगळा रस्ता अवलंबला. लाईमलाईटपासून दूर तिने आपलं वेगळं करिअर सुरु केलं. प्रेरणा लेखिका आहे. 4 / 7प्रेरणाचे आतापर्यंत तीन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. तिचं पहिलं पुस्तक 'द फिमेल सुपरनॅचरल बीईंग इन कंटेम्पररी गॉथिक लिटरेचर एँड फिल्म' 2015 मध्ये पब्लिश झालं.5 / 7यानंतर तिचं 'इंडियाज मोस्ट हॉन्टेड:टेल्स ऑफ टेरिफायिंग प्लेसेज' आणि 'द शेफर्ड लाइज' ही दोन्ही पुस्तके प्रकाशित झाली. बॉबी, सनी आणि अभय देओल अनेकदा आपल्या भाच्चीचे पुस्तक सोशल मीडियावर शेअर करत प्रमोट करत असतात. 6 / 7सध्या प्रेरणा ३३ वर्षांची आहे. तर तिला साहिल गिल हा भाऊही आहे. प्रेरणाला घरी प्रेमाने 'पिचू' म्हणतात. 2017 मध्ये प्रेरणाने प्रसिद्ध एडव्होकेट पुलकित देवडासोबत लग्न केले. पुलकित देवडा दिल्लीतच प्रॅक्टिस करतात. 7 / 7प्रेरणा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिचे फोटो पाहून लक्षात येतं की ती कोणा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. मात्र आई आणि मावशीप्रेमाणे तिनेही लाईमलाईटपासून दूर राहणं आणि अभिनय क्षेत्रात न येणंच पसंत केलं.