By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 08:00 IST
1 / 10‘गहराइयां’ हा दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडेचा सिनेमा येत्या 11 तारखेला रिलीज होतोय. या सिनेमात दीपिका, सिद्धांत व अनन्याशिवाय आणखी एक चेहरा आहे. तो म्हणजे दीपिकाचा पार्टनर.2 / 10होय, दीपिकाच्या पार्टनरची भूमिका साकारणाऱ्या या हँडसम हिरोची सध्या जोरदार चर्चा आहे. तो कोण तर त्याचं नाव धैर्य कारवा. आता हा धैर्य कोण, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.3 / 10 तर हा धैर्य कारवा कॉजेलात शिकत असतानाच मॉडेलिंगमध्ये आला आणि नंतर बॉलिवूडमध्ये त्याची एन्ट्री झाली. रणवीर सिंगच्या अलीकडे रिलीज झालेल्या 83 या सिनेमातही तो दिसला होता. त्याने यात रवी शास्त्री यांची व्यक्तिरेखा साकारली होती.4 / 10खरं तर एमबीए केल्यानंतर धैर्यला उच्चशिक्षणासाठी युरोपात जायचं होतं. पण हँडसम इतका की, त्याला मॉडेलिंगच्या आॅफर येऊ लागल्या. मग काय, या विश्वात धैर्य असा काही रमला की, उच्च शिक्षणासाठी युरोपला जाण्याचा प्लॅन त्याने कँन्सल केला.5 / 10मॉडेलिंग करत असतानाच त्याने बॉलिवूड सिनेमांसाठी आॅडिशन देणं सुरू केलं आणि त्याला पहिला ब्रेक मिळाला. धैर्यचा पहिला सिनेमा कोणता माहितीये, तर उरी.6 / 10 2019 साली प्रदर्शित झालेल्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या सिनेमामधून त्याचा डेब्यू झाला. या सिनेमामध्ये त्याने कॅप्टन सरताज सिंग चंढोक ही भूमिका साकारली होती.7 / 10पहिल्याच सिनेमात विकी कौशल, यामी गौतम आणि परेश रावल या दिग्गज कलाकारांसोबत त्याच्या पहिल्याच सिनेमामध्ये काम करण्याची संधी त्याला मिळाली.यानंतर अॅमेझॉन प्राइमवरील ‘मेड इन हेवन’या रोमँटिक सीरिजमध्ये तो झळकला. 8 / 10शकुण बत्रा यांच्या ‘गहराइयां’ या चित्रपटामध्ये धैर्यने करण नावाचं पात्र साकारला आहे. दीपिका पदुकोणच्या पार्टनरचा रोल त्याने साकारला आहे. 9 / 10‘गहराइयां’तील करणचा रोल मिळवण्यासाठी धैर्यला खोटं बोलावं लागलं. होय, त्याची उंची 6 फूट 4 इंच आहे. पण मेकर्सला त्याने 6 फूट 2 इंच उंची असल्याचं खोटं सांगितलं होतं. जास्त उंचीमुळे हा रोल आपल्या हातून जाईल, अशी भीती त्याला होती. त्यामुळे त्याने खोटी उंची सांगितली होती.10 / 10पण त्याची ही चोरी लवकरच पकडली गेली होती. ‘गहराइयां’चा सेट तयार झाला होता. पण या सेटचे दरवाजे धैर्यची उंची बघता लहान पडले. मग त्याच्यामुळे सेटवर नवे दरवाजे बनवावे लागले होते. माझी उंची 6 फूट 4 इंच असल्याची कबुली धैर्यला त्यावेळी द्यावी लागली होती.