By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 10:49 IST
1 / 10भूतकाळ पिच्छा सोडत नाही म्हणतात, ते उगाच नाही. आता दीपिका पादुकोणचंच बघा. तिच्या भूतकाळातील लव्ह अफेअरची चर्चा आजही होते.2 / 10दीपिका सध्या पती रणवीर सिंगसोबत आनंदात संसार करतेय. पण याआधी तिच्या लव्ह लाईफमध्ये अनेक चढऊतार आलेत. अनेक ड्रामे पाहायला मिळाले.3 / 10दीपिकाचं नाव अनेकांशी जुळलं. यात विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्या याचंही नाव होतं. एकेकाळी दीपिका व सिद्धार्थच्या अफेअरची चर्चा जोरात होती.4 / 10फारच कमी वेळात दीपिका व सिद्धार्थचं नातं चर्चेत आलं आणि तेवढ्याच लवकरच दोघांचं ब्रेकअपही झालं. या ब्रेकअपमागचं कारण खुद्द दीपिकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.5 / 10दीपिका व सिद्धार्थचं बे्रकअप का झालं? यामागचं कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. इंटरनॅशनल बिझनेस टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत दीपिका यावर बोलली होती.6 / 10मी हे नातं वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण मी त्यात अपयशी ठरले, असं दीपिका या मुलाखतीत म्हणाली होती.7 / 10आमच्यात सगळं काही ठीक होतं. पण काही काळानंतर सिद्धार्थ विचित्र वागू लागला होता. अखेरचं आम्ही डिनरला भेटलो तर त्याने सर्वांसमोर मला बिल भरायला सांगितलं. तो क्षण माझ्यासाठी खूप लाजीरवाणा होता, असं ती म्हणाली होती.8 / 10त्यानंतर हे नातं संपवण्याऐवजी दुसरा कुठलाही चॉईस माझ्याजवळ उरला नव्हता. मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकेल, असं काहीही त्याच्याकडून घडत नव्हतं, असं तिने सांगितलं होतं.9 / 10बिल भरायला सांगितलं, त्यात काय एवढं? असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. पण गोष्ट पैशांची नसून भावनांची आहे. कदाचित हीच गोष्ट दीपिकाला खटकली असावी.10 / 10दीपिकाच्या या स्टेटमेंटनंतर सिद्धार्थ माल्याने आपली बाजू मांडली होती. दीपिका क्रेझी मुलगी आहे. माझ्याकडून घेतलेले महागडे गिफ्ट कदाचित ती विसरली. मी व्हॅकेशन, पार्ट्यांवर बराच पैसा खर्च केला कदाचित हे ती विसरली, असं तो म्हणाला होता.