Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानसोबत अफेअरच्या चर्चा ते अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय; फिल्मी करिअरपेक्षा खासगी आयुष्यच चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 20:06 IST

1 / 9
'दंगल' फेम बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख कायमच चर्चेत असते.
2 / 9
तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. शिवाय तिचा फिल्मी करियर ग्राफ उत्तम आहे.
3 / 9
फातिमाने बालकलाकार म्हणून आपल्या करियरची सुरूवात ‘इश्क’ चित्रपटातून केली होती. पण, फातिमाला ‘दंगल’ चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली.
4 / 9
फातिमा सना शेखने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं. प्रदीर्घ काळ प्रसिद्धी न मिळाल्यामुळे अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला आणि फोटोग्राफीच्या क्षेत्रात काम करू लागली.
5 / 9
पण 'दंगल' सिनेमाची ऑफर आली आणि तोच तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला.
6 / 9
फातिमा सना शेख खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आमिर खानसोबत तिचं नाव जोडलं गेलं आहे.
7 / 9
आमिर आणि किरणच्या घटस्फोटची बातमी समोर आल्यानंतर या दोघांचा घटस्फोट हा फातिमा सना शेखमुळे झाल्याचा अंदाज सोशल मीडिया युझर्सनी लावायला सुरुवात केली होती. तिला ट्रोलही केलं गेलं होतं. तर फातिमाने मुलाखतीमध्ये सांगितले होते की आमिर खान आणि तिच्यामध्ये फक्त प्रोफेशनल नाते आहे.
8 / 9
नुकतेच फातिमा विकी कौशलसोबत 'सॅम बहादूर' सिनेमात दिसली.
9 / 9
आता आगामी कोणत्या चित्रपटात फातिमा दिसते याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष आहे.
टॅग्स :फातिमा सना शेखसेलिब्रिटीबॉलिवूडआमिर खान