उत्तराखंडची मुलगी, ७ वर्षांपूर्वी इंडस्ट्रीत आली; ८०० कोटींचा सिनेमा करुन रातोरात झाली स्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 14:01 IST
1 / 8अनेक छोट्या गावातील मुला मुलींचं टीव्ही किंवा बॉलिवूडमध्ये येऊन हिरो-हिरोईन होण्याचं स्वप्न असतं. त्या स्वप्नाच्या दिशेने घरदार सोडून ते मायनगरीत येतात. कोणी यशस्वी होतं तर काहींना अपयशही येतं.2 / 8अशीच एक अभिनेत्री जी पहाडी भागातून आली. सुरुवातीला मॉडेलिंग, जाहिराती, युट्यूब व्हिडिओ करत नशीब आजमावलं. अचानक नशीब पालटलं आणि थेट ८०० कोटी कमावणाऱ्या सिनेमातून ती नावारुपाला आली.3 / 8ही अभिनेत्री आहे तृप्ती डिमरी (Tripti Dimri). १९९४ साली तिचा उत्तराखंडमधील गढवाल गावात जन्म झाला. तिने सुरुवातीचं शिक्षण तिथेच घेतलं. यानंतर दिल्ली विश्वविद्यालयातून मानसशास्त्राचा अभ्यास केला.4 / 8तृप्तीने पुण्यातील FTII मध्ये प्रवेश घेतला. यानंतर तिने मुंबईत येऊन ऑडिशन द्यायला सुरुवात केली. २०१७ साली 'पोस्टर बॉइज' सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 5 / 8तृप्तीने आतापर्यंत ८ सिनेमे केले आहेत. 'लैला मजनू', 'बुलबुल', 'कला', 'अॅनिमल', 'भूलभुलैय्या ३', 'बॅड न्यूज', 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' या सिनेमांचा समावेश आहे.6 / 8तृप्तीने 'कला', 'लैला मजनू' सारखे सुंदर सिनेमे दिले मात्र ती 'अॅनिमल' सिनेमामुळे जास्त चर्चेत आली. यात तिने रणबीर कपूरसोबत न्यूड सीनही दिला. यानंतर तृप्तीकडे सिनेमांची रांगच लागली.7 / 8आगामी 'धडक २', 'आशिकी ३', 'अॅनिमल पार्क' या सिनेमांमध्ये ती दिसणार आहे. शिवाय आणखीही काही सिनेमांची चर्चा सुरु आहे.8 / 8तृप्ती वैयक्तिक आयुष्यात सुरुवातीला अनुष्का शर्माच्या भावाला डेट करत होती. तर सध्या ती बिझनेसमन सॅम मर्चंसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दोघंही सध्या एकत्र व्हॅकेशनवर गेले आहेत.