Join us
Daily Top 2Weekly Top 5

२८ वर्षात इतके बदलले 'बॉर्डर' सिनेमातील कलाकार! आता कसे दिसतात? काहींना ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:21 IST

1 / 10
'बॉर्डर 'मध्ये जॅकी श्रॉफ, सनी देओल, सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका होत्या. त्याकाळी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.आता जवळपास २९ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
2 / 10
या चित्रपटात सनी देओलसोबत नव्या कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे.यामुळे चित्रपटाच्या मूळ कलाकारांबद्दल बरीच चर्चा सुरू झाली आहे.
3 / 10
आता हे कलाकार काय करतात? कसे दिसतात? याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
4 / 10
१९९७ साली आलेल्या या ब्लॉकबस्टर चित्रपटात सनी देओलने त्याने मेजर कुलदीप चांदपुरी यांची भूमिका साकारली होती. त्याने ही भूमिका पडद्यावर जीवंत केली. आता बॉर्डर-२ मधून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. अभिनेता आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे.
5 / 10
'बॉर्डर' चित्रपटात सुनील शेट्टीने कॅप्टन भैरव सिंगची भूमिका साकारली आणि आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केलं होतं. आता सुनीलचा मुलगा, अहान शेट्टी, 'बॉर्डर २' मध्ये दिसणार आहे. अभिनेता सुनील शेट्टी आता ६४ वर्षांचा असूनही आजही तितकाच फिट दिसतो.
6 / 10
बॉलिवूडचा 'भिडू' म्हणून ओळखले जाणारे अभिनेते जॅकी श्रॉफ'बॉर्डर' चित्रपटात विंग कमांडर अँडी बाजवा यांच्या भूमिका साकारली. त्यांच्या सिनेमातील कामाची सर्वत्र प्रशंसा झाली. जॅकी श्रॉफ आता ६८ वर्षांचे असूनही, इंडस्ट्रीत सक्रिय आहेत.
7 / 10
बॉर्डर-२ सिनेमा येत्या २३ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने सर्वाधिक चर्चा जर कोणत्या कलाकाराची होत असेल तर तो अक्षय खन्ना. सध्या धुरंधरचं यश अनुभवणाऱ्या अक्षय खन्नाची चाहते या चित्रपटात उणीव भासणार आहे. अक्षय खन्नाने 'बॉर्डर' चित्रपटात लेफ्टनंट धर्मवीर सिंगची भूमिका साकारली होती आणि आजही त्याच्या अभिनयाची तितकीच चर्चा होते.
8 / 10
बॉर्डर सिनेमाबद्दल चर्चा होते, तेव्हा अभिनेते सुदेश बेरी यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. सुदेश बेरी यांनी २८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सुभेदार मथुरादास नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. सुदेश बेरी गेल्या काही वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत.
9 / 10
बॉर्डर मधील महिला कलाकारांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, अभिनेत्री पूजा भट्ट्ने चित्रपटातील आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. गेल्या २८ वर्षांत अभिनेत्री फारच बदलली आहे.ती आता अभिनयापासून दूर असली तरी कायम लाईमलाइटमध्ये असते.
10 / 10
'बॉर्डर' सिनेमामध्ये अभिनेत्री शर्बानी मुखर्जी यांनी सुनील शेट्टीच्या ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका साकारली. शर्बानी मुखर्जी आता चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत.मात्र, अनेकदा ती मुखर्जी कुटुंबासोबत दिसते. २८ वर्षात अभिनेत्री फार बदलली असून तिचा ओळखणंही कठीण आहे.
टॅग्स :सनी देओलअक्षय खन्नासुनील शेट्टीजॅकी श्रॉफसीमारेषापूजा भट