Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिरोच्या बरोबरीनं मानधन घेणारा खलनायक! खऱ्या आयुष्यातही घाबरायचे लोक, राजेश खन्नांबरोबर कधीच केलं नाही काम, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:58 IST

1 / 9
हिंदी चित्रपट सृष्टीतील नायक ते खलनायक आणि पुढे चरित्र अभिनेता अशा प्रदीर्घ कारकिर्दीतील अभिनयाने हिंदी चित्रपटांवर ठसा उमटवणारेअभिनेते म्हणजे प्राण.
2 / 9
हिंदी चित्रपटातील खलनायक हा प्राण यांच्यामुळे ओळखला जाऊ लागला. प्राणनाथ किशननाथ सिकंद असे संपूर्ण नाव असलेल्या अभिनेत्याचा जन्म १२ फेब्रुवारी १९२० ला दिल्ली येथे झाला. आपल्या ७० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं.
3 / 9
खानदान या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. १९४२ साली आलेल्या या चित्रपटात ते नायकाच्या भूमिकेत होते. प्राण यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लाहोरमध्ये तयार झालेल्या १७ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
4 / 9
हिंदी चित्रपटातला खलनायकीचा इतिहास नायकगिरी इतकाच दीर्घ व सरस आहे. याकुब, कन्हय्यालाल या खंद्या नटांपासून परेश रावल आणि अमरीश पुरी या अष्टपैलू नटांनी तो समृद्ध केला आहे. मात्र प्राणसाहेबांनी हिंदी चित्रपटातल्या व्हिलनला 'स्टार' बनवलं, हिरोच्या बरोबरीला नेलं आणि व्हिलनसाठी मोठा चाहतावर्ग निर्माण केला ही त्यांची कामगिरी असामान्य आहे.
5 / 9
'अपराधी', 'गृहस्थी', 'खानदान'आणि 'बडी बहन' ,'जिस देश में गंगा बहती है','मजबूर' आणि 'शहीद' अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचे रंग भरले.
6 / 9
दिलीप कुमार, देव आनंदपासून शम्मी कपूर, विश्वजितपर्यंत सगळ्या हिरोंना त्यांनी नायिकेच्या प्राप्तीसाठी टक्कर दिली.सहा दशकांमधल्या सुपर स्टार्सबरोबर ते बरोबरीनं वावरले.त्याच्या दमदार अभिनयाने त्याने खलनायकाची भूमिका इतक्या ताकदीने साकारायचे की त्यावेळी लोक खऱ्या आयुष्यातही त्यांना घाबरायचे.
7 / 9
प्राण यांनी आपल्या अभिनय कारकि‍र्दीत इंडस्ट्रीतील प्रत्येक कलाकाराबरोबर स्क्रीन शेअर केली.पण, त्यांनी राजेश खन्नांसोबत कधीच काम केलं नाही. प्राण त्याकाळी हिरोपेक्षा जास्त मानधन घेत होते. तर राजेश खन्ना सर्वात जास्त फी घेणारे नायक होते. या दोघांनाही एकाच चित्रपटात घेतलं तर त्याचा परिणाम चित्रपटाच्या बजेटवर होण्याती भीती निर्मात्यांना असायची.
8 / 9
नायक नायिकांनंतर खलनायकांचं नाव श्रेयनामावलीत येणं त्यांना मान्य नव्हतं. सर्व कलाकारांची नावं येऊन गेल्यावर '.. आणि प्राण' (अँड प्राण!) असं आपलं नाव झळकवण्याचा आग्रह त्यांनी धरला. हिरोच्या बरोबरीनं मानधन आणि तसाच चाहतावर्ग असलेल्या प्राणसाहेबांची ही अटदेखील निर्मात्यांनी तत्काळ मान्य केली.
9 / 9
त्यांच्या हिंदी सिनेसृष्टीतील योगदनाबद्दल त्यांना चित्रपटसृष्टीत सर्वोच्च समजल्या जाणार्‍या अत्यंत प्रतिष्ठेच्या समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार २०१३ साली प्रदान करण्यात आला.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाराजेश खन्ना