९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री, जिच्या भानगडीत दाऊदने प्रोड्यूसरला झाडल्या गोळ्या, कोण होती ती?
By देवेंद्र जाधव | Updated: August 4, 2025 13:40 IST
1 / 8१९९०च्या दशकात बॉलीवूडमध्ये एक अभिनेत्री आली होती जी अल्पावधीत खूप लोकप्रिय झाली. ही अभिनेत्री म्हणजे अनीता अयूब2 / 8अनिता मूळची पाकिस्तानची आहे. तिने बॉलीवूडमध्ये देव आनंद यांच्या 'प्यार का तराना' (१९९३) या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.3 / 8अनीता दिसायला सुंदर होती आणि अभिनयही चांगला करत होती, त्यामुळे तिला पुढे अनेक चित्रपटांची ऑफर मिळाली.पण तिच्या करिअरपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती अधिक चर्चेत राहिली.4 / 8त्या काळात अनिताचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत जोडलं गेलं. दोघांचे संबंध असल्याच्या चर्चा जोरात होत्या.5 / 8अनेक मीडिया रिपोर्टनुसार एका निर्मात्याने अनिताला त्याच्या चित्रपटात घेतलं नाही म्हणून त्याची गोळ्या घालून हत्या झाली, आणि त्यामागे दाऊदचा हात असल्याचा संशय होता.6 / 8या प्रकरणानंतर अनीता अयूबवर अनेक आरोप झाले. त्यानंतर अनीता अयूबवर भारतासाठी पाकिस्तानमध्ये जासूसी करत असल्याचाही आरोप झाला.7 / 8या सर्व वादांमुळे तिला चित्रपटसृष्टीतून बाहेर काढण्यात आलं आणि तिचं करिअर लवकरच संपुष्टात आलं. नंतर अनीता अयूबने भारतीय उद्योजक सौमिल पटेल याच्याशी लग्न केलं आणि काही काळ न्यूयॉर्कमध्ये राहिली.8 / 8त्यानंतर घटस्फोटानंतर तिने दुसरं लग्न पाकिस्तानी व्यापारी सुबक मजीद याच्याशी केलं. सध्या ती सर्वच ग्लॅमरपासून दूर, एक साधं जीवन जगत आहे.