Join us  

सिक्युरिटी गार्ड होता, एका रात्रीत सुपरस्टार झाला..., हेमंत बिर्जे कसा बनला ‘बॉलिवूडचा टार्जन’?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 3:59 PM

1 / 8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात अभिनेता हेमंत बिर्जे, त्याची पत्नी रेश्मा आणि मुलगी आमना जखमी झालेत. हा हेमंत बिर्जे म्हणजे, बॉलिवूडचा टार्जन.
2 / 8
होय, 1985 साली प्रदर्शित ‘अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टार्जन’ या चित्रपटातील टार्जन आठवत असेल तर तोच हा टार्जन. होय, ही भूमिका हेमंत बिर्जे यांनी साकारली होती.
3 / 8
बॉलिवूडमध्ये ‘वन टाइम वंडर’ अशा कलाकारांची मोठी यादी आहे. हेमंत बिर्जे यापैकीच एक. टार्जन सिनेमानंतर तो स्टार बनला होता. पण आज बॉलिवूडमधून पुरता गायब आहे.
4 / 8
हेमंत मुंबईत सिक्युरिटी गार्डची नोकरी करायचा. एक दिवस दिग्दर्शक बब्बर सुभाष यांची नजर हेमंतवर पडली आणि त्यांनी त्याला टार्जनची ऑफर दिली. यानंतर काही महिन्यांचं ट्रेनिंग झालं आणि हेमंत हिरो बनून कॅमे-यापुढे उभा राहिला. हा त्याचा पहिला सिनेमा होता.
5 / 8
पहिल्या सिनेमात हेमंतला किमी काटकर सारख्या त्याकाळच्या आघाडीच्या अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळाली होती.
6 / 8
अभिनेत्री किमी काटकरसोबतच्या काही बोल्ड सीनमुळे टार्जन चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती.
7 / 8
टार्जन हा सिनेमा प्रचंड गाजला. यानंतर हेमंतने अनेक सिनेमांत काम केलं. सलमान खान, मिथुन चक्रवर्तीसारख्या सुपरस्टार्ससोबतही काम केलं. पण त्याचे सिनेमे आपटले आणि त्याच्या करिअरला ओहटी लागली.
8 / 8
हळूहळू बॉलिवूडचा हा टार्जन इंडस्ट्रीतून गायब झाला. 2016 साली तो अचानक चर्चेत आला होता. हेमंत आर्थिक संकटाचा सामना करत असल्याची आणि घरमालकाने घराबाहेर काढल्याची माहिती समोर आली होती.
टॅग्स :बॉलिवूडकिमी काटकरसेलिब्रिटी