Join us

"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 18:17 IST

1 / 9
बॉलिवूड आणि ग्लॅमर हे एक अजोड असे समीकरण आहे. बॉलिवूड अभिनेत्रींना चित्रपटात काम मिळवण्यासाठी अभिनय, फिटनेस आणि सौंदर्य या तिन्ही गोष्टींची हमखास गरज असते.
2 / 9
स्वत:ला कायम ताजेतवाने ठेवण्यासाठी प्रत्येक अभिनेता-अभिनेत्री विविध गोष्टी करत असतात. काही अभिनेत्री योगसाधना करतात, तर काही अभिनेत्री त्वचेची निगा राखण्यासाठी खास उपाय करतात.
3 / 9
आपले सौंदर्य टिकवण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी अभिनेत्री खास पद्धतीचे रूटीन फॉलो करतात. अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिचे 'बाथरूम सीक्रेट' म्हणजेच आंघोळीबद्दलचे गुपित सांगितले आहे.
4 / 9
'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री विद्या मालवदे हिने केलेला खुलासा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तिने सांगितले, 'गेल्या दहा वर्षांत तिने साबणाला हातही लावलेला नाही.'
5 / 9
'मी साबणाचा वापर केलेला नाही. पण तरीही माझी त्वचा निरोगी आणि आजही तितकीच मऊ आहे. माझी आंघोळीची पद्धत पारंपरिक असून त्यात ध्यानधारणेचाही समावेश आहे.'
6 / 9
'आंघोळीदरम्यान मी थोडावेळ पाण्याबाहेर उभी राहते. चमचाभर मीठात पाण्याचे थेंब टाकून ते संपूर्ण शरीराला चोळते. त्यानंतर ३० सेकंद ध्यान करून पुन्हा स्वच्छ आंघोळ करते.'
7 / 9
'मीठ आपल्यातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. ते नैसर्गिक क्लीनजिंग आहे. महिन्यातून सलग १० दिवस अशाप्रकारची आंघोळ मी करते आणि मग ब्रेक घेते.'
8 / 9
'मग इतर दिवशी नुसते पाणी, गुलाबजल किंवा बेसन-उटणे वापरते. खूप घाम, आऊटडोअर शूट किंवा प्रदूषित वातावरणात केवळ पाणी पुरेसे नसते. घामामुळे दुर्गंधी, इन्फेक्शनचा धोका असतो.'
9 / 9
'शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी बेसन-उटणे किंवा गुलाबजलसारखा पर्याय चांगला असतो. त्याने त्वचाही मुलायम राहण्यास मदत होते,' असे विद्याने स्पष्ट केले.
टॅग्स :विद्या माळवदेबॉलिवूडहिंदी