1 / 12शिल्पा शेट्टी ही फिल्म इंडस्ट्रीतील अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी स्वतःच्या बळावर यश मिळवलं आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरातीतून केली होती. चित्रपटसृष्टीत सेकेंड लीड एक्ट्रेस म्हणून तिने एन्ट्री केली. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 2 / 12असंख्य चित्रपटांमध्ये इतकी अप्रतिम कामगिरी केली आहे की प्रत्येक चित्रपटातून शिल्पाने रसिकांची मनं जिंकली आहेत. आज ती केवळ एक यशस्वी अभिनेत्रीच नाही तर अनेकांसाठी आदर्श देखील आहे. अभिनेत्रीशी संबंधित आणखी काही रंजक गोष्टी जाणून घेऊया...3 / 12अभिनयासोबतच शिल्पाने बिझनेस आणि फिटनेसमध्येही नशीब आजमावलं आहे. शिल्पाने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरच मॉडेलिंगमध्ये पाऊल ठेवलं. तिची पहिली जाहिरात लिम्का कोल्ड्रिंकची होती. या जाहिरातीद्वारे तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.4 / 12शिल्पा शेट्टीने 1993 मध्ये 'बाजीगर' चित्रपटातून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवलं. पहिल्याच सिनेमात शिल्पाने आपल्या अभिनयाने मोठ्या अभिनेत्रींचं टेन्शन वाढवलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि चित्रपटाच्या यशानंतर शिल्पाने मागे वळून पाहिलेच नाही.5 / 12कोट्यवधींची मालकीण शिल्पा शेट्टीला आज कशाचीच कमतरता नाही. तिला पाहिजे ते विकत घेता येते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिला एका गोष्टीची प्रचंड भीती वाटते, ती म्हणजे गाडी चालवायला ती खूप घाबरतो. 6 / 12याच कारणामुळे शिल्पा जिथे जाते तिथे गाडी नेहमीच तिचा ड्रायव्हर चालवतो, ती स्वतः चालवत नाही. चित्रपटांमध्येही बॉडी डबलचा वापर कारच्या अॅक्शन सीनसाठी केला जातो शिल्पा चित्रपट आणि जाहिरातींमधून मोठी कमाई करते हे सर्वांना माहीत आहे. याशिवाय तिचे अनेक व्यवसाय आहेत जिथून ती खूप पैसे कमावते. 7 / 12शिल्पाने फिटनेसशी संबंधित व्यवसायात नशीब आजमावलं आहे. काही वर्षांपूर्वी तिने स्वतःची योगा डीव्हीडी लाँच केली. सकस आहारावर एक पुस्तकही लिहिले होते, जे खूप वाचले गेले. तिच्याकडे स्वतःचे फिटनेस एप (सिंपल सोलफुल) आणि रेस्टॉरंट देखील आहेत. 8 / 12शिल्पा शेट्टीने राज कुंद्रा सोबत लग्न केलं असून त्यांनी दोन गोंडस मुलं देखील आहेत. शिल्पा पतीच्या व्यवसायाशी देखील जोडली गेली आहे. ती नेहमीच लोकांना फिटनेस गोल देत असते. तसेच सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 1210 / 1211 / 1212 / 12