By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 16:35 IST
1 / 8 एखाद्या अभिनेत्रीला लक्स साबणाची जाहिरात मिळणे म्हणजे, हिंदी चित्रपटनगरीतील ती सर्वात सौंदर्यवान अभिनेत्री समजली जाते. लक्स साबणाची पहिली जाहिरात करणार्या अभिनेत्री लीला चिटणीस. 2 / 8लक्स साबणाच्या जाहिरातीत त्या काळी फक्त हॉलिवूडमधील नायिका झळकत होत्या. लक्स साबणाची सुरुवात १८९९ मध्ये सनलाइट फ्लैक्स म्हणून सुरु झाली होती. १९२५ मध्ये भारतीय बाजारात लक्स साबणाने प्रवेश केला प्रथमतः त्यांच्या जाहिरातींमध्ये हॉलिवूडच्या अभिनेत्री झळकत होत्या. मात्र, १९४१ मध्ये जाहिरातीत भारतीय चेहर्याची गरज वाटू लागली आणि त्यांच्या जाहिरातीतील पहिला भारतीय चेहरा म्हणजे लीला चिटणीस यांचा होता. 3 / 84 / 8 शिक्षण घेत असतानाच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली व शाळा महाविद्यालयातील नाटकातून त्या अभिनय करु लागल्या. एका इंग्रजी प्राध्यापकाची मुलगी असलेल्या लीला चिटणीस उच्च शिक्षित होत्या. जेव्हा त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तेव्हा त्या आधीच पदवीधर होत्या. बॉलिवूडची पहिली पदवीधर अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखलं जातं.त्यांचा प्रेम विवाह डॉ. चिटणीस यांच्यासोबत झाला.परंतु, हे लग्न फार काळ टिकलं नाही.5 / 8पदरी असलेल्या चार मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी काही दिवस एका शाळेत शिक्षिकेची नोकरी केली. त्यावेळी नाटकातील कामे सुरुच ठेवली. नाटकातील अभिनयाने त्यांना चित्रपटसृष्टीची दारे उघडली. श्री सत्यनारायण या त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.6 / 8त्या काळात लीला चिटणीस यांनी रोमॅन्टिक भूमिका केल्या. काहीशा बुजऱ्या अशोककुमारचा आत्मविश्वास वाढविण्यात लीला चिटणीस यांचा फार मोठा हातभार आहे. आपण नायिकेच्या भूमिकेत यशस्वी होत असतानाच त्यांनी ' शहीद ' मध्ये दिलीपकुमारच्या आईची भूमिका स्वीकारत आपल्या धाडसी वृत्तीची झलक दाखविली. दिलीप-राज-देव आनंद या रुपेरी पडद्यावर सर्वात यशस्वी त्रिकुटाची लीला चिटणीस पडद्यावरची यशस्वी आई ठरली. 7 / 8त्या काळात, लीला चिटणीस आपल्या चित्रपटातली गाणी स्वत:च गायच्या आणि त्या गाण्यावर त्या अशा काही धमाल नाचायच्या की लोक त्यांचा तो नाच पाहून वेडावून जायचे. ' झूला ' मधल्या ' हिंडोले कैसे झूलू... ' व ' झूलो के संग... ' या दोन गाण्यांवर त्या अगदी धमाल नाचल्या होत्या. त्यांच्या नृत्यावर अनेक जण अगदी जीव ओवाळून टाकायला तयार असायचे.8 / 8 लीला चिटणीस यांनी त्यांनी चंदेरी दुनियेत' हे आत्मचरित्रही लिहिले आहे.लीला चिटणीस यांनी अभिनयाव्यतिरिक्त १९५५ मध्ये आज की बात या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी अमेरिकेतील मोठ्या मुलाच्या घरी त्यांचे १४ जुलै २००३ ला निधन झाले.