'विवाह' मधील 'छोटी' आठवतेय? आता दिसते फारच सुंदर! १९ वर्षात इतका बदलला अभिनेत्रीचा लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 17:40 IST
1 / 7सिनेसृष्टीत मुख्य भूमिका न करताही काही अभिनेते अभिनेत्री कायम प्रेक्षकांना लक्षात राहतात. त्यापैकीच आपल्या अभिनय शैलीने प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अमृता प्रकाश.2 / 7अमृताने ४ वर्षांची असतानाच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. 'तुम बिन'या हिंदी चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेतून अमृताने मोठ्या पजद्यावर पदार्पण केलं.3 / 7केवळ चित्रपटच नव्हे तर अमृता प्रकाश अनेक गाजलेल्या मालिका आणि जाहिरातींमध्ये झळकली आहे. मात्र, तिला खरी ओळख विवाह या चित्रपटाने दिली.4 / 7अमृता राव आणि शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २००६ साली रिलीज झाला. या चित्रपटात तिने पूनमची (अमृता राव) च्या बहिणीची म्हणजेच छोटी हे पात्र साकारलं होतं.5 / 7'विवाह' मध्ये सावळ्या रंगाची आणि साधी दिसणारी छोटी आता पूर्वीपेक्षा फार वेगळी दिसते.6 / 7अमृता प्रकाश सध्या अभिनय क्षेत्रापासून दुरावली असली तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.7 / 7अमृता प्रकाश आता खूपच सुंदर दिसते. सोशल मीडियावरील तिचे फोटो पाहून चाहते तिला ओळखू शकले नाहीत.