Join us
Daily Top 2Weekly Top 5

१७ व्या वर्षी बस अपघातात गमावला पाय, दु:खाला कवटाळून न बसता ती उभी राहिली; गाठलं यशाचं शिखर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 13:37 IST

1 / 8
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार सापडतील, ज्यांनी अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही इंडस्ट्रीत स्वत चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. यातीलच एक नाव म्हणजे सुधा चंद्रन.
2 / 8
टीव्ही मालिकांव्यतिरिक्त, हिंदी चित्रपटांमध्ये दिसलेल्या सुधा चंद्रन त्यांनी साकारलेल्या नकारात्मक पात्रांसाठी ओळखली जातात. 'कहीं किसी रोज' या मालिकेतील रमोला सिकंदर आणि 'नागिन' या मालिकेतील यामिनी या पात्रातून त्यांनी प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
3 / 8
सुधा यांनी वयाच्या साडेतीन वर्षापासून भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली होती. एवढेच नाही तर त्या अभ्यासातही टॉपर होत्या. सुधा चंद्रन यांचे वडील के. डी. चंद्रन हे केरळचे रहिवासी होते. त्यांनी मुंबईतील अमेरिकन लायब्ररीत काम केले तर त्यांची आई थंगम, गृहिणी आणि शास्त्रीय गायिका होती.
4 / 8
सुधा यांनी त्यांच्या जीवनावर आधारित तेलुगू चित्रपट 'नाचे मयुरी' मधून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर हा चित्रपट तामिळ, मल्याळममध्ये डब करण्यात आला आणि त्याचा हिंदी रिमेक 'नचे मयुरी' हा चित्रपटही बनवण्यात आला.
5 / 8
एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अभिनेत्रीसोबत एक दुर्दैवी घटना घडली आणि त्यांच्या करिअरला ब्रेक लागला.
6 / 8
वयाच्या १७ व्या वर्षी तिरुचिरापल्लीहून मद्रासकडे जात असताना अभिनेत्री सुधा चन्द्रन यांच्या बसचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. प्लास्टर लावल्यावर डावा पाय बरा झाला, पण उजव्या पायात ‘गॅंग्रीन’ (एक प्रकारचा कॅन्सर) होण्याची शक्यता दिसू लागली. अशा परिस्थितीत डॉक्टरांना त्यांचा उजवा पाय कापण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर अपघातानंतर एका महिन्याच्या आत त्यांचा उजवा पाय गुडघ्यापासून साडे सात इंच खाली कापण्यात आला. डॉक्टरांनी पुन्हा कधीच चालत येणार नाही सांगितलं पण सुधाने कधीही हिम्मत हरली नाही. सुधाचे वडील म्हणजे अभिनेते के. डी. चंद्रन यांना सुधाला व्हीलचेअरवर पाहून अश्रू आवरता आले नाही. वडिलांचे अश्रू पाहून तिने पुन्हा कधीच व्हील चेअरवर बसणार नाही अशी शपथ घेतली. कुबड्याच्या साहाय्याने त्यांनी चालायला सुरुवात केली.
7 / 8
काही काळानंतर मेग्सेसे पुरस्कार विजेते कृत्रिम अवयव तज्ज्ञ डॉ. पी.सी. सेठी यांच्याशी भेट झाली. उपचारानंतर सुधा यांनी पुन्हा नृत्याचा सराव सुरू केला. या घटनेनंतर कोणाहीची पुन्हा नाचण्याची हिम्मत होणार नाही. पण सुधा सामान्य नव्हत्या नृत्य प्रशिक्षकाला घेऊन त्या पुन्हा डॉ. सेठी यांच्याकडे गेल्या. नृत्याची आवड समजून डॉ. सेठी अभ्यास करून पुन्हा विशिष्ट रचना करून कृत्रिम पाय बसवला त्यावेळी त्यांनी सुधाला सांगितले की, “मी जे काही करू शकतो ते केले, आता तुझी वेळ आहे.” यानंतर सुधा यांनी पुन्हा नृत्याची तालीम सुरु केली.
8 / 8
या घटनेनंतर त्यांच्याकडे चित्रपट, मालिकांच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या. त्यांचा सहजसुंदर अभिनय पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अभिनेत्रीने हा जिद्दीने घडवलेला प्रवास अनेकांसाठी प्रेरणा देणारा आहे.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीप्रेरणादायक गोष्टी