१८ व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्डशी कनेक्शन; आता अशी दिसते ९०च्या दशकातील 'ओये ओये गर्ल', फोटो बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 17:06 IST
1 / 8 बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नानंतर अभिनय क्षेत्राला रामराम करत आपलं वेगळं विश्व निर्माण केलं.या अभिनेत्रींमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सोनमचाही नंबर लागतो. 2 / 8 त्रिदेव, विजय आणि अजूबा यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून झळकणाऱ्या सोनम खानची एकेकाळी चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ होती. 3 / 8 सोनमचं खरं नाव बख्तावर खान हे होतं. ती अभिनेते रजा मुराद यांची भाची आहे. ९० च्या दशकातील फॅशन आयकॉन म्हणून तिच्याकडे पाहिलं जायचं.4 / 8 सोनम त्रिदेव सिनेमात ओए ओए गाण्यामुळे तर ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली होती.आजही लोक तिचं ते गाणं विसरले नाहीत.मात्र,सोनम तिच्या बोल्ड लूकमुळे त्याकाळी चर्चेत होती. 5 / 8 बॉलिवूडसह तिने तेलगू सिनेमातही आपलं नशीब आजमावलं.पण, अचानक यशाच्या शिखरावर असताना सोनमने इंडस्ट्रीला रामराम केला. यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचं सांगितलं जातं.6 / 8 १९९१ मध्ये राजीव राय यांच्याशी लग्न केल्यानंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली. लग्नानंतर त्यांच्यामध्ये खटके उडू लागले आणि मग ते दोघेही विभक्त झाले.7 / 8 एकेकाळी आपल्या सौंदर्य आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असणारी ही नायिका आता फारच बदलली आहे.8 / 8सोनम सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. मात्र,इतक्या वर्षानंतर अभिनेत्रीचा लूक पूर्णपणे बदलला आहे.