1 / 7अगदी कमी वयात तिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवून आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं. 2 / 7बॉलिवूडची ही लोकप्रिय अभिनेत्री सेन्सेशनल क्वीन म्हणून तिला ओळखली जाते. परंतु, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना साल २००० मध्ये शिल्पा शिरोडकरने बॅंकर अपरेश रणजीत यांच्यासोहत लग्न करुन इंडस्ट्रीला रामराम केला. ती लंडनला गेली आणि तिथेच स्थायिक झाली. 3 / 7 अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने लग्नानंतर तिचं आयुष्यातील काही किस्से शेअर केले आहेत. 4 / 7लग्नानंतर शिल्पा शिरोडकर तिच्या पतीसोबत पहिल्यांदा नेदरलँड्स आणि त्यानंतर ती न्यूझीलंडला शिफ्ट झाली. तिथे तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि ती पार्लरमध्ये हेअर ड्रेसरचं काम करु लागली.5 / 7याविषयी बोलताना शिल्पा म्हणाली, 'मी स्वतःला कायम कामात व्यस्त ठेवण्यासाठी न्यूझीलंडमध्ये एक हेअरस्टायलिस्टचा कोर्स पूर्ण केला. हे काम माझ्या अभिनय क्षेत्राशी निगडित होते. त्यामुळे या कोर्सनंतर मी जवळपास दोन महिने सलूनमध्ये काम हेअरड्रेसरचं काम केलं.'6 / 7त्यानंतर अभिनेत्री म्हणाली,'तेव्हा नुकतंच आमचं लग्न झालं होतं. शिवाय त्यावेळी हेअरस्टायलिस्टच्या नोकरीला प्रचंड मागणी होती. नवरा आठवड्याच्या शेवटी सुट्टी घ्यायचा आणि त्या दिवशी नेमकं मला काम करावं लागत होतं. त्याचबरोबर आम्हाला एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेळ हवा होता. मग मी ती नोकरी सोडली.'7 / 7त्यावेळी मी माझ्या पतीला सीव्ही तयार करण्यास सांगितलं होतं, असा किस्साही तिने शेअर केला. त्याविषयी सांगताना शिल्पा म्हणाली, 'जेव्हा माझ्या पतीने विचारलं की तिच्या सीव्हीमध्ये काय लिहू, तेव्हा मी त्याला स्पष्टपणे म्हटलेलं, 'खोटं असं काही लिहू नकोस, जे काही आहे ते खरी माहिती लिह. मी दहावी नापास आहे आणि चित्रपटांमध्ये मी जे काही काम केलंय त्याबद्दलही मेन्शन कर.'