1 / 7बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जिने सलमान खानसोबत सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण पुढे तिला आयुष्यात असे धक्के मिळाले ज्यामुळे ती आज चाळीत हलाखीचं जीवन जगतेय. या अभिनेत्रीचं नाव आहे पूजा डडवाल.2 / 7पूजा डडवालने १९९५ मध्ये 'वीरगती' या चित्रपटातून वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. 3 / 7काही काळानंतर पूजाला मिळणाऱ्या चित्रपटांच्या ऑफर्स कमी झाल्या, त्यामुळे तिने आपला मोर्चा टीव्ही इंडस्ट्रीत वळवला. तिने 'आशिकी' आणि 'घराना' सारख्या मालिकांमध्ये काम केले, पण चित्रपटांमध्ये तिला हवे तसे यश मिळाले नाही.4 / 7पुढे अपेक्षित यश न मिळाल्याने तिने सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. लग्न झाल्यानंतर ती गोव्यात स्थायिक झाली आणि तिथे पतीसोबत मिळून एक कसिनो सांभाळू लागली. परंतु २०१८ मध्ये पूजाला गंभीर स्वरूपाच्या TB चे निदान झाले. अत्यंत कठीण प्रसंगी तिच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी तिला एकटे सोडून दिले, असे सांगितले जाते.5 / 7जेव्हा पूजाची जगण्याची आशा मावळली होती, तेव्हा तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून मदतीचे आवाहन केले. हे आवाहन पाहून अभिनेता रवी किशन आणि सलमान खान मदतीसाठी धावून आले. सलमान खानने पूजाच्या उपचारांचा सहा महिन्यांचा सर्व खर्च उचलला.6 / 7आजारपणातून बरी झाल्यानंतर पूजासमोर पोटापाण्याचा मोठं आव्हान होते. ती मुंबईतील एका १० बाय १० च्या छोट्या खोलीत (चाळीत) राहायला आली. जगण्यासाठी तिने घरकाम देखील केले.7 / 7२०२० मध्ये तिने 'शुक्राणा: गुरु नानक देव जी का' या पंजाबी चित्रपटाद्वारे तिने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण तो चित्रपट यशस्वी झाला नाही. आज पूजा मुंबईत एक टिफिन सर्व्हिस चालवून आपले आयुष्य जगत आहे.