Join us
Daily Top 2Weekly Top 5

शौक बडी चीज है! रोल्स रॉयल्समधून फिरणारी पहिली भारतीय अभिनेत्री, स्टाईल अन् अदाकारिची आजही होते चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 18:35 IST

1 / 9
हिंदी चित्रपटांमध्ये खलनायिका साकारून अनेक अभिनेत्रींनी प्रसिद्धी मिळवली. मात्र, अशी एक अभिनेत्री होऊन गेली तिची आजही आठवण काढली जाते.
2 / 9
एकेकाळी अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये झळकून नादिरा या अभिनेत्रीचं नाव प्रत्येकाच्या तोंडी ऐकू येऊ लागलं.
3 / 9
सिनेसृष्टीत खलनायिका म्हणून मोठी लोकप्रियता मिळवण्यासोबत त्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या या अभिनेत्रीच्या त्याकाळी चांगलीच चर्चा होती.
4 / 9
५ डिसेंबर १९३२ साली बगदादमध्ये नादिरा यांचा जन्म झाला. नादिरा यांचं कुटुंब मूळचं बगदादचे, एका ज्यू कुटुंबात त्या वाढल्या. त्याचं बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं.
5 / 9
नादिरा यांनी बॉलिवूडची सध्याची अभिनेत्री आलिया भट्टचे आजोबा दादा नानाभाई भट्ट यांच्या मौज सिनेमातून आपल्या अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. १९४३ साली आलेल्या मौज या सिनेमातून त्यांनी वयाच्या १०व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
6 / 9
पहिल्या सिनेमानंतर त्यांना 'आन' सिनेमात काम मिळालं. आन या सिनेमानंतर नादिरा प्रचंड लोकप्रिय झाल्या.
7 / 9
नादिरा त्या काळातील सर्वांत जास्त मानधन घेणारी अभिनेत्रींपैकी एक होत्या.रोल्स रॉयल्स कारमधून फिरणारी ही पहिली भारतीय अभिनेत्री होती.
8 / 9
युरोपियन चेहेरेपट्टी असल्यामुळे त्यांना विविध धाटणीच्या भूमिका साकारायला मिळाल्या. नादिरा यांनी आन , श्री, पाकिझा , ज्यूली हे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले. त्यांनी २००० सालापर्यंत सिनेमात काम केलं.
9 / 9
अखेरच्या त्या शाहरुखच्या जोश सिनेमात दिसल्या होत्या. वाढत्या वयानुसार अनेक आजारांनी ग्रासलं. त्यामुळे त्यांनी गुपचूप सिनेसृष्टी सोडली.९ फेब्रुवारी २००६ साली वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी