Join us

लॉकडाऊननंतर आता अशाप्रकारे चित्रीत केले जाणार इंटिमेट सीन, मंदना करिमीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 08:00 IST

1 / 7
सध्या कोरोनाने सगळीकडे थैमान घातले आहे. भारतात लॉकडाऊन असला तरी काही निर्बध आता शिथिल करण्यात आले आहेत. लवकरच चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाला देखील मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार आहे.
2 / 7
आता चित्रपट, मालिका, वेबसिरिजमधील इंटिमेट दृश्य खूप वेगळ्या पद्धतीने चित्रीत केले जाणार असल्याचे मंदनाचे म्हणणे आहे.
3 / 7
आजवर ईराणी चित्रपटांमध्ये इंटिमेट दृश्य वेगळ्या पद्धतीने चित्रीत केले जात असल्याचे देखील मंदनाने सांगितले आहे.
4 / 7
कोरोनामुळे आता चित्रीकरण करताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे अतिशय गरजेचे असल्याचे देखील मंदनाने म्हटले आहे.
5 / 7
मंदना द कसिनो या वेबसिरिजमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. कोरोनामुळे आता चित्रीकरण करताना सगळेच प्रचंड घाबरलेले असणार असे देखील तिला वाटते.
6 / 7
मंदना सांगते, मी इराणी असून अनेक इराणी चित्रपट मी आवडीने पाहिले आहेत. तिथल्या चित्रपटांमध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी इंटिमेट सीनचा वापर केला जात नाही. आता आपल्याकडे देखील यात बदल होईल असे मला वाटते.
7 / 7
मंदना बिग बॉस या कार्यक्रमामुळे नावारूपाला आली.
टॅग्स :बॉलिवूड