By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 17:34 IST
1 / 9 मधुबाला, भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुरेख स्वप्नच जणू. आजही सौंदर्यातील शेवटचा शब्द म्हणजे ‘मधुबाला’च समजला जातो. अभिनेत्रीचं आरस्पानी सौंदर्य,लज्जतदार लाजणं, तिचं खळाळून हसणं, खोडकरपणे हसणारे जीवघेणे नेत्रकटाक्ष, प्रेमातील उत्कटता आणि विरहातील व्याकुळता टिपणारे तिचे डोळे, सारं कसं जिवंत मनाला सुखावणारे होते.2 / 9अभिनय सम्राट दिलीप कुमार यांच्यापासून गानसम्राट किशोरकुमार यांच्या पर्यंत सारेच तिच्यावर फिदा होते. १४ फेब्रुवारी १९३३ रोजी, अताऊल्लाखान (मूळ पठाणी), ह्यांना दिल्लीच्या निवासस्थानी कन्यारत्न प्राप्त झालं. या मुलीचे 'मुमताज़ जहान बेगम देहलावी' असे नामकरण झाले. १९४२ साली, 'बसंत या चित्रपटातून अभिनेत्रीने रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं.एक 'चाईल्ड आर्टिस्ट' म्हणून हा त्यांचा प्रवास सुरु झाला होता. 3 / 9 त्या काळच्या सुप्रसिद्ध नायिका 'देविका राणी' ह्यांनी, बेबी मुमताज़ चा प्रसन्न वावर, आकर्षक देहबोलीवर लुब्ध होत त्यांना मधुबाला हे नाव दिलं. त्यानंतर अभिनेत्री सर्वांची लाडकी मधू झाल्या.4 / 9 अवघ्या १४ व्या वर्षात त्यांना किदार शर्मा लिखीत, दिग्दर्शित चित्रपट त्यांना मिळाला ज्यात 'राज कपूर' प्रमुख नायक होते, 'नील कमल' असं या सिनेमाचं नाव होतं. आपल्या डोळ्यांच्या अदाकारीने, कमनीय बांध्याने दिलखूलास हास्याने अनेकांच्या काळजांचा ठाव घेणारी, ही मनमोहिनी अवतरली रूपेरी पडद्यावर 'महल' चित्रपटातून.महल चित्रपटाच्या यशानंतर, म्हणजे साधारण १९५०-५४ ह्या कालावधीत तिने २४ चित्रपटांत कामे केली.‘हावडा ब्रीज’ मध्ये तिनं धमाल करून सोडली होती. ओ.पी. च्या ठसकेबाज गाण्यावर ती रंगात आली होती.5 / 9 मात्र, कामाशी एकनिष्ठ, कर्तव्यात कसूर न पडू देणार्या ह्या अप्सरेचा आजाराने घात केला. 'वर्निक्युलार सेप्टल डिफेक्ट- हृदयात छिद्र असणं. अभिनेत्रीचा हा आजार चित्रपट्सृष्टीपासून बराच काळ लपवून ठेवण्यात आला.१९५४ साली आलेल्या 'बहोत दिन हुवे' नावाच्या चित्रपटा दरम्यान मधूबाला यांना रक्ताची उलटी झाली आणि त्यानंतर सगळंच बिघडलं.6 / 9'ज्वार भाटा'च्या चित्रिकरणाच्यावेळी दिलीप कुमार आणि मधुबाला यांची भेट झाली. तेव्हा त्यांनी बालकलाकार म्हणून ओळख मिळवली होती. यानंतर मग 'तराना' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी त्यांच्या प्रेमात पडली,सेटवरच चित्रिकरणादरम्यान, एक एवलेसे प्रेमपत्र लिहून...अभिनेत्रीने प्रेमाची कबुली दिली.५ वर्षे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या ह्या प्रेमाचा शेवट वाईट झाला.7 / 9या अभिनेत्रीच्या रुप- सौंदर्याची नोंद भारतीयांनीच घेतली असे नाही, तर त्या काळी 'हॉलीवूडच्या' काही मॅगझीन्स नेही तिला डोक्यावर घेतलं होतं.१९६० मध्ये, गायक 'किशोर कुमार' यांच्याशी मधुबाला यांचा विवाह संपन्न झाला. किशोरदांना १९५८ च्या 'चलती का नाम गाडी' चित्रपटादरम्यान भेटली, लगेच ६१ साली 'झुमरू' प्रदर्शित झाला. त्यांच्या विवाहास मात्र किशोरदाचे पालक उपस्थित नव्हते कारण हा विवाह त्यांना अमान्य होता. 8 / 9मुघल्-ए-आझम़ च्या वेळेस तास न तास चित्रीकरण, अनेक तास ढणाणत्या दिव्यांखाली उभे राहून मेक-अप ह्यामुळे तिची तब्बेत पार ढासळली.१९६१ च्या सुरुवातीला मधू-किशोर लंडनला गेले, तिथे तज्ञांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला.9 / 9अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया तिच्या वाचण्याची खात्री फार कमी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. भारतात येताच तिला किशोरदाने तिच्या वांद्रा येथील निवासस्थानी सोडलं. त्यानंतर अभिनेत्री एकटी पडली. अखेरीस २३ फेब्रुवारी १९६९ साली एक सुंदर, देखणी नटी पंचतत्वात विलीन झाली.