Join us

फिटनेस अन् लूकमध्ये सलमानवर भारी पडतोय कतरिनाचा बॉडीगार्ड; अनेकदा नाकारल्या आहेत सिनेमाच्या ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 13:06 IST

1 / 13
कलाविश्वातील सेलिब्रिटी बऱ्याचदा त्यांच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असतात. यात सध्या अभिनेत्री कतरिना कैफची चर्चा रंगली आहे.
2 / 13
अभिनेता विकी कौशलसोबत कतरिनाने लग्न केल्यापासून ती तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे.
3 / 13
बऱ्याचदा विकीमुळे चर्चेत येणारी कतरिना सध्या तिच्या बॉडीगार्डमुळे चर्चेत येत आहे.
4 / 13
सध्या सोशल मीडियावर कतरिनाचा बॉडीगार्ड दिपक सिंह चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे फिटनेस आणि लूक यांच्यामुळे त्याची चर्चा होत आहे.
5 / 13
कतरिनाचा बॉडीगार्ड लूक आणि फिटनेसच्या बाबतीत सलमान खानसारख्या भल्या भल्या अभिनेत्यांनीही मात देत आहे.
6 / 13
दिपक सिंहला अनेकदा काही चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या. मात्र, त्याने या ऑफर्स नाकारल्या.
7 / 13
दिपकला क्रिकेटपटू व्हायचं होतं. मात्र, अचानकपणे तो या क्षेत्रात आला आणि येथेच रमला.
8 / 13
दिपकची “डोन सिक्युरिटी सर्व्हिसेस” ही स्वत:ची सुरक्षा एजन्सी आहे. तर त्याचे वडील सैन्य अधिकारी असल्याचं म्हटलं जातं.
9 / 13
दिपकने आतापर्यंत शाहरुख खान, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रणबीर कपूर, राणी मुखर्जी, सचिन तेंडुलकर यांसारख्या कालाकारांकडे बॉडीगार्ड म्हणून काम केलं आहे.
10 / 13
दिपक सोशल मीडियावर सक्रीय असून त्याचे स्टायलिश फोटो शेअर करत असतो.
11 / 13
सोशल मीडियावरही त्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचं दिसून येतं.
12 / 13
दिपकचं लग्न झालं असून त्याला एक लहान मुलगीदेखील आहे.
13 / 13
दिपक मूळचा आग्र्यामधील असून अभिनेता रोनित रॉयचा नातेवाईक असल्याचं सांगण्यात येतं.
टॅग्स :कतरिना कैफसेलिब्रिटीसिनेमा