By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 18:15 IST
1 / 9 एकीकडे बॉलिवूडमध्ये शर्मिला टागोर, मुमताज आणि हेमा मालिनी सारख्या ताकदीच्या नायिका पडदा गाजवत असताना जया भादुड़ी या नावाच्या एका मुलीने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. 2 / 9 ७० च्या शतकात कोणत्याही नवख्या कलाकाराला अभिनयाच्या या जगात पाय रोवणं जरा कठीणंच होते. पण,आपला साधेपणा आणि निरागसतेने प्रेक्षकांच्या मनावर जया भादुडी यांनी गारुड घातलं.3 / 9 अभिनयाव्यतिरिक्त जया बच्चन या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. त्या नवीन कलाकारांसाठी मातृवत मार्गदर्शक तर आहेच पण गेल्या बर्याच वर्षांपासून त्या चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीच्या अध्यक्ष आहेत.ख्यातनाम पत्रकार तरुणकुमार भादुडी यांच्या तीन मुलींपैकी जया भादुडी ही थोरली मुलगी.आज जया यांचा वाढदिवस आहे.4 / 9भोपाळच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंटमध्ये प्राथमिक शिक्षण घेत असतांना खेळाच्या मैदानातही जयाचे नाव गाजत होते. पंतप्रधान नेहरुंच्या हस्ते एन.सी.सी. बेस्ट कॅडेटचा पुरस्कारही जयाने मिळवला आहे. 5 / 9१९६२ साली अशाच एका शुटिंगकरता वडीलांबरोबर जया जगन्नाथपुरी येथे गेली. त्यादरम्यान तरुणकुमार जयाला घेऊन कलकत्त्याला आले. त्यांच्या घरी राहत असताना सत्यजित राय यांनी बोलावल्याचा निरोप आला. एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाने बोलावले म्हटल्यावर कोणीच नकार देऊ शकले नाही. तिथे गेल्यानंतर सत्यजित राय यांनी जयासमोर ‘महानगर’ चित्रपटात काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. 6 / 9 मग वर्षभरानंतर फिल्म इन्स्टिट्यूटचे प्राचार्य जगत मुरारी यांच्या ऋषिकेश मुखर्जी गुड्डी या चित्रपटासाठी एका चांगल्या मुलीच्या शोधात होते. 'गुड्डी' चित्रपटही गाजला आणि जया यांना लगेचच ‘उपहार' या चित्रपटासाठी मुख्य नायिकेची ऑफर मिळाली. 7 / 9 चित्रपटातील पारंपारिक पेहराव, सामान्य वागण्याने अभिनेत्रीने प्रेक्षकांची मने जिंकली. अत्यंत कुशलतेने आपल्या इमेजमध्ये बदल केला आणि पिया का घर, अनामिका, परिचय, कोरा कागज, अभिमान, मिली, कोशिश सारखे उत्तम चित्रपट केले. ताकदीची अभिनेत्री म्हणून ओळख झाल्यावर त्यांच्यासमवेत काम करताना भलेभले कलाकरही घाबरत असत. 8 / 9 आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी अमिताभ बच्चन आणि संजीवकुमार यांच्याबरोबर त्यांनी बरंच काम केलं.१९७२ ते ८१ या काळात जया यांनी अमिताभ यांच्याबरोबर जवळपास आठ चित्रपट केले.9 / 9लग्नानंतर त्या संसारात रमून गेल्या. अमिताभ यांना सुपर स्टार म्हणून लौकिक मिळवून देण्यासाठी त्यांनी चित्रपटात काम करण्याचे थांबवून त्यांना आधार दिला.