बहिणीच्या नवऱ्यासोबत पडद्यावर रोमान्स, यश मिळालं पण नशीबाने दिला दगा! कॅन्सरमुळे झालं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 17:08 IST
1 / 7अभिनयाच्या ग्लॅमरस जगात टिकून राहण्यासाठी नशीब असावं लागतं असं म्हटलं जातं. नशीबाने दगा दिला तर हिंदी चित्रपटसृष्टी निष्ठूर होत एखाद्याला प्रवाहातून कसं बाहेर फेकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे अभिनेत्री सिंपल कपाडिया.2 / 7सिंपल कपाडिया ही एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री होती. १५ ऑगस्ट १९५८ रोजी मुंबईत जन्मलेल्या सिंपल कपाडिया यांना दोन मोठ्या बहिणी आणि एक भाऊ आहे. 3 / 7 सिंपलच्या डिंपल आणि रीमा कपाडिया या दोन्ही बहिणी बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित होत्या. यातील रीमा कपाडियाचे वयाच्या २४ व्या वर्षी ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे निधन झालं.4 / 7आपल्या करिअरमध्ये सिंपलने अभिनयासोबतच फॅशन डिझायनर म्हणूनही काम केलं होतं. मात्र, या अभिनेत्रीची कारकिर्दी तिच्या बहिणीप्रमाणे बहरली नाही.5 / 7चित्रपटांपेक्षा सिंपल कपाडिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली. प्रसिद्ध चित्रपट निर्माते टुटू शर्मा, अभिनेता शेखर सुमन आणि बी-टाऊनचा खलनायक रणजीत यांच्यासोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं.6 / 7 मात्र, ही अभिनेत्री काही काळानंतर इंडस्ट्रीपासून दुरावली. दर्जेदार चित्रपटांमध्ये काम करुनही तिला यशाची चव चाखायला मिळाली नाही. 7 / 7यानंतर अभिनय सोडून सिंपल कपाडिया डिझायनिंगकडे वळली. यश हाती येत असतानाच या अभिनेत्रीला कॅन्सरने गाठलं. अखेरीस १० नोव्हेंबर २००९ साली या अभिनेत्रीचं निधन झालं.