Join us
Daily Top 2Weekly Top 5

५० व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्रीला पडली मराठी लूकची भुरळ; नथ अन् साडी परिधान करुन लुटली मैफिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 15:11 IST

1 / 7
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री चित्रांगदा सिंह सध्या तिच्या एका वेगळ्या लूकमुळे चर्चेत आली आहे. ५० व्या वर्षी चित्रांगदाने मराठमोळा लूक करुन सर्वांचं लक्ष वेधलंय.
2 / 7
चित्रांगदाचे नवीन फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यात ती चक्क 'मराठी मुलगी' या अवतारात दिसत आहे. कपाळावर चंद्रकोर, नथ आणि साडीतील तिचा हा साजिरा लूक पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
3 / 7
चित्रांगदा सिंह एका फॅशन लूकमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये चित्रांगदाने हा खास लूक केला आहे. चित्रांगदाने हा लूक करुन फॅशन शोमध्ये उपस्थित असलेल्या मान्यवरांची पसंती मिळवली.
4 / 7
''चित्रांगदा या मराठी साजात अतिशय सुंदर आणि सात्विक दिसत आहे,' अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. तर काहींनी तिला 'सुंदर मराठी मुलगी' असं संबोधलं आहे. तिच्या या साध्या तरीही प्रभावी लूकने पुन्हा एकदा तिच्या फॅशनला चाहत्यांनी पसंती दिली आहे.
5 / 7
चित्रांगदाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अपूर्व लाखिया दिग्दर्शित 'मातृभूमी' चित्रपटात ती झळकणार आहे. हा चित्रपट गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित असून, सलमान खान यात कर्नल संतोष बाबू यांची भूमिका साकारत आहे.
6 / 7
'मातृभूमी' हा चित्रपट १७ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु काही कारणास्तव याची तारीख आता ऑगस्ट २०२६ पर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. या चित्रपटात सलमान आणि चित्रांगदा यांची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे,
7 / 7
'मातृभूमी' या चित्रपटात ती एका सैनिकाच्या पत्नीची महत्त्वाची भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटातील 'चाँद देख लेना' या गाण्याचा बीटीएस (BTS) व्हिडिओही समोर आला होता. यात चित्रांगदा-सलमानच्या केमिस्ट्रीने लक्ष वेधलं.
टॅग्स :चित्रांगदा सिंगबॉलिवूडफॅशनमराठी