Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुठे गायब झाली बॉबी डार्लिंग? एका निर्णयामुळे इंडस्ट्रीतून गेली बाहेर; आता ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 16:18 IST

1 / 9
तुम्हाला बॉबी डार्लिंग आठवते का? अनेक चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय करुन बॉबी डार्लिंग प्रकाश झोतात आली होती. बॉबी डार्लिंग म्हणजे आताची पाखी शर्मा.
2 / 9
एका मध्यमवर्गीय कुटुंबात पंकज शर्मा या मुलाचा जन्म झाला. मात्र, कालांतराने आपण एक मुलगी असल्याची जाणीव त्याला झाली. त्याच्या वागण्यातील बदल पाहून कुटुंबियांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.
3 / 9
घरातून बाहेर पडल्यानंतर पंकजने त्याच्यातील बदल स्वीकारला आणि तो पाखी शर्मा झाला. सुरुवातीला बारमध्ये डान्स करुन पाखी तिचं पोट भरत होती. त्यानंतर तिने मॉडेलिंग करत बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
4 / 9
आज बॉलिवूडमध्ये पाखी, बॉबी डार्लिंग याच नावाने प्रसिद्ध आहे. बॉबी डार्लिंगने ताल, कसौटी जिंदगी की, अपना सपना मनी मनी, टॉम डिक अँड हॅरी, नॉटि बॉय, क्या कुल है हम अशा कितीतरी मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
5 / 9
बॉबीने एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं होतं. मात्र, काही वर्षांनी ती अचानकपणे कलाविश्वापासून दूर झाली. तिचा एक निर्णय तिला महागात पडला. त्यामुळेच ही बॉबी सध्या काय करते? कशी दिसते असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.
6 / 9
आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या बॉबीला खऱ्या आयुष्यात अनेक दु:ख, संकटांचा सामना करावा लागला.
7 / 9
बॉबीला इंडस्ट्रीमध्ये सातत्याने गे, तृतीयपंथी यांसारख्याच भूमिकांची ऑफर मिळत होती. मात्र, 'मी पहिली ट्रान्सवूमन असून माझी सर्जरी झाली आहे. त्यामुळे लोकांनी माझ्याकडे स्त्री म्हणून पाहावं आणि तशाच भूमिका मला मिळाव्यात', अशी इच्छा व्यक्त केली होती. इतकंच नाही तर तिने अनेक सिनेमांच्या ऑफर्सही धुडकावून लावल्या. परिणामी, तिला काम मिळणं बंद झालं.
8 / 9
बॉबी गेल्या कित्येक वर्षांपासून कलाविश्वापासून दूर गेली आहे. इतकंच नाही तर आता तिच्यात कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे तिला ओळखणं तसं कठीण झालं आहे.
9 / 9
बॉबीने लग्न सुद्धा केलं होतं. पण लग्नाच्या काही दिवसांनंतर तिने पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत घटस्फोट घेतला. त्यानंतर मध्यंतरी बॉबीला पॅरालिसिसचा अटॅक आला होता.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन